
कुडाळ (प्रतिनिधी) – सचिन वारागडे
कुडाळ ता. 5 – जावली तालुक्यातील कुडाळ या ठिकाणी विविध गणेश मंदिरांमध्ये गणेश जयंती उत्साहात साजरीकरण्यात आली. ता.1 फेब्रुवारी रोजी दिवसभर भाविकांनी गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. अभिषेक, गणेश याग, सत्यनारायण पुजा, होमहवन व महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन विविध सार्वजनिक मंडळांच्या वतीने करण्यात आले होते.कुडाळ येथील बाजारपेठेतील मानाचा महागणपती नटराज गणेश मंदिर येथे गणेशजयंतीनिमित्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.गणेश जयंतीनिमित्तगणेश मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती,यावेळी सातारा जावलीचे आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रतापगडकारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे, मेढ्याचे नुतन सहाय्यक पोलिस निरिक्षक सुधीर पाटील , यांच्यासह विविधक्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन दर्शन घेतले, यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.याशिवाय गणेश जंयतीनिमित्त मंदिरामध्ये दिवभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नटराज फेस्टीव्हल मध्ये जादुगार शिवम यांचे प्रयोग पाहण्यासाठी रेकाँर्ड ब्रेक गर्दी
तालुक्यातील एकमेव फेस्टीव्हल कुडाळ येथील नटराज युवक मंडळाच्या वतीने घेण्यात येतो, यावषीही ता.2 रोजीघेण्यात आलेला नटराज फेस्टीव्हल उत्साहात पार पडला, यावेळी ग्रामिण भागातील जनतेसाठी मनोरंजनाच्याउद्देशाने घेण्यात आलेल्या फेस्टीव्हला अभूतपुर्व गर्दीने प्रतिसाद मिळाला, यावेळी जगभरात सर्वत्र नावलैकीकअसलेल्या जादुगार शिवम यांचा जादुचा कार्यक्रम पाहण्यासाठी रेकाँर्ड ब्रेक गर्दी झाली होती, यावेळी मान्यवरांच्याहस्ते जादुगार शिवम व त्यांचे चिरंजिव व त्यांच्या टीमचा भव्य सत्कार करण्यात आला,यावेळी जादुगार शिवमयांनी उपस्थितांना आपल्या जादुने अक्षरशा मंत्रमुग्ध केले, लहान बालचमुंनी सर्व जादुच्या प्रयोगाचा मनमुरादआनंद लुटला, चित्तथरारक प्रयोग बघून उपस्थित भारावून गेले.यावेळी कार्यक्रम जादूगार शिवम यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो महिलांनी व मुलांनी कार्यक्रमासाठी गर्दी केली होती कुडाळ गावामध्ये जादूगार शिवम चा कार्यक्रम असल्यामुळे गावामध्ये जणू काय यात्रा भरली आहे असं वातावरण निर्मिती झाली होती कार्यक्रमात जादूगार शिवम यांनी पोट धरून हसवत हसवत रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज गाजवले या ठिकाणी यावेळीआपल्या जादू कलेच्या माध्यमातून गेले 27वर्षे झाले कार्यक्रम करत देशाची समाजसेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे यावेळी आपल्या कलेच्या माध्यमातून हसवत हसवत जादू विज्ञान चमत्कार व श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर आधारित भोंदूगिरी लोक कसे फसवतात त्याच्यावर आधारित एक प्रयोग दाखवत त्याप्रयोगाचा पडदा फाश केला त्यावर प्रयोग बघून ग्रामस्थांनी कौतुक करत जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले असे अनेक प्रयोग दाखवून मुलांना व ग्रामस्थांना महिलांना मनोरंजनातून समाजप्रबोधनाकडे आकर्षित करत होते
मुलांना हसवत हसवत मोबाईलचे दुष्परिणाम सांगत आजपासून मोबाईल हातामध्ये लहान मुलांनी घ्यायचा नाही अशी शपथ घेण्यात आली मुलाने फक्त अभ्यासापुरता मोबाईल हातामध्ये घ्यायचा असे सांगत आपण सर्वांनी निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज आहे त्याचबरोबर हसत खेळत विदाऊट टेन्शनच आपलं आयुष्य जगलं पाहिजे असा एक संदेश दिला माझे एकच ध्येय आहे की आज महाराष्ट्रात आश्रमातली मुले अनाथ मुले मतिमंद मुले अशा अनेक मुलांना आपल्या जादू कलेचा आनंद देण्याचा माझा प्रयत्न आहे माझ्या जादूप्रेमी यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आनंद हास्य उभा राहून डान्स करत कार्यक्रमाचा आनंद घेत ते पाहून मला जो आनंद मिळाला तो पैसे देऊन कुठेही मिळाला नसता हे मी माझ्या जीवनात कमावले कार्यक्रमाचे आयोजक महेश बारटक्के व अध्यक्ष व त्यांची कमिटी यांनी मनापासून जादूगार शिवम यांचे कौतुक करत माननीय श्री सौरभबाबा शिंदे चेअरमन यांच्या हस्ते जादूगार शिवम यांचा सन्मान करण्यात आला
