
कुडाळ २५- महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक तथा पक्ष प्रमुख आयु.संजय (भैय्या) सोनवणे हे महाराष्ट्र मधील स्वाभिमानी नेतृत्व आहे आयु.सोनावणे यांच्या आदेशाने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे काम महाराष्ट्रमध्ये जोरदार सुरू आहे.आजपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचा वापर करण्यात नेत्यांना यश आले ,कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे,कार्यकर्ता घडला पाहिजे याच उद्देशाने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची वाटचाल महाराष्ट्रात सुरू आहे.त्याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे नवनिर्वाचित सातारा जिल्हाध्यक्ष आयु.किरण बगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सर्किट हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सातारा जिल्ह्यातील पक्ष विस्तारं करण्यासाठी प्रत्येक गावागावात कार्यकर्ते यांच्या माध्यमातून पक्ष बांधणी सर्व पदाधिकारी यांना विचारात घेऊन तरुण चेहऱ्यांना संधी देणारं करणार असून सातारा जिल्ह्यामध्ये पक्षाचे काम मजबूत करण्यासाठी वंचित,पीडित,शोषित कामगार यांच्या हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सज्ज होणार आहे. असे मत जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी बोलताना व्यक्त केले.

सोमनाथ धोत्रे म्हणाले किं विविध पक्षात कार्यकर्ते नाराज आहे आजपर्यंत कार्यकर्ते यांचं वापर झालं मात्र कार्यकर्ते यांच्या साठी मी काम करणार आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम आग्रहि राहणार त्यासाठी विविध तालुक्यातील महिला,युवक,कामगार,पदाधिकारी यांच्या लवकरच निवडी करण्यात येणार आहेत.
एडवोकेट श्री नलावडे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हक्काने अधिकार दिलेले आहेत पण आजपर्यंत अनेक नेत्यांनी फक्त कार्यकर्त्यांचा वापर केला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये काम करण्याचे आव्हान अनिल उमापे यांनी केले व आभार अनिल उमापे यांनी मानले यावेळी आवाहन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष आयु किरण बगाडे युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे अनिल उमापे,संतोष भिसे, मंगेश गायकवाड प्रणित मोरे सयाजी भिसे विजय सातपुते श्रीकांत शिंदे किरण जाधव सुनील कदम, रणवीर परदेशी सूरज भिसे अरविंद घाडगे शौकत कुरेशी अजय अवताडे राकेश खरात योगेश माने (पैलवान ) व इतर असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
