
कुडाळ ता. 24 – कै.लालसिंगराव बापूसेा शिंदे सहकारी पतसंस्थेच्या स्वीकृत संचालक पदी मोरघर ता. जावली येथील भानुदास तुकाराम गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली .स्वीकृत संचालक म्हणून ही निवड करण्यात आली आहे.

भानुदास गायकवाड हे गुन्हे अन्वेषण विभागाचे निवृत्त पोलीस अधिकारी असून महिगाव विकास सेवा सोसायटीचे ते अध्यक्षही होते. संस्थेचे मार्गदर्शक व प्रतापगड काराखाना चे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांच्याकडे आनेवाडी, सायगाव, महिगाव विभागातून अनेक कार्यकर्त्यांनी स्वीकृत संचालक पदासाठी भानुदास गायकवाड यांच्या नावाची शिफारस केली होती. कारखाना गटाचे जूने सहकारी म्हणून सैारभबाबा शिंदे यांनीही भानुदास गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले व आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत श्री गायकवाड यांची एकमताने संचालक म्हणून निवड केली. भानुदास गायकवाड यांनी यापूर्वीही पतसंस्थेचे संचालक म्हणून काम केले होते सन 2006 ते 2011 या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन आमदार शशिकांत शिंदे व स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांच्यामध्ये पतसंस्थेची निवडणूक अटीतटीची झाली होती त्यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांना मदत करून भानुदास गायकवाड हे संचालक म्हणून निवडून आले होते त्यामुळे स्वर्गीय लालसिंगराव शिंदे व राजेंद्र शिंदे यांच्या कारखाना गटाचे भानुदास गायकवाड हे कट्टर समर्थक मानले जातात, त्यामुळे आनेवाडी सायगाव विभागात भानुदास गायकवाड यांच्या माध्यमातून संस्थेला फायदा होईल या उद्देशाने त्यांना स्वीकृत संचालक पदी निवड करण्यात आली. निवडीनंतर मानयवर व संचालकांच्या उपस्थितीती त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक नितिन दुदुस्कर यांनी सर्वांचे आभार मानले.

