
कुडाळ दि.२२- मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी सुधीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज मंगळवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. जावळी तालुक्यातील एकीव जवळील हॉटेल जय मल्हार मध्ये झालेल्या वादग्रस्त नाईट पार्टी वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे वादात अडकले होते. त्यामुळे गेले काही दिवस मेढा पोलीस ठाण्याचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील सांभाळत होत्या.

दरम्यान आज पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांची मेढा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आज मंगळवारी सुधीर पाटील यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी आपणाकडून जावळी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न होतील असे त्यांनी सांगितले.

