कुडाळ ता. 31 – राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा १ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता आंबेघर येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार असून शिवेंद्रसिंह राजेना केबिनेट मंत्रीपद मिळाले त्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती युवा नेते सागर धनावडे, नाना जांभळे, रामभाऊ शेलार यांनी दिली.
जावली तालुक्यात ना. शिवेंद्रराजे आणि ज्ञानदेव रांजणे हे समीकरण अत्यंत दृट झाले आहे ना शिवेंद्रराजे यांचे विश्वासू सहकारी म्हणून रांजणे यांच्याकडे पाहिले जाते लोकसभेला शिवेंद्रराजेंच्या सांगण्यानुसार खा उदयनराजेंसाठी व आता विधानसभेला खुद्द शिवेंद्रराजेंसाठी ज्ञानदेव रांजणे यांनी खूप मेहनत घेतली जावली तालुक्याच्या प्रचाराची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन शिवेंद्रसिंहराजेंना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी मोलाचा हातभार लावला राज्यात शिवेंद्रसिंहराजेंना दोन नंबरचे विक्रमी मताधिक्य मिळाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळावे ही मागणी प्रथमता रांजणे यांनी लावून धरली होती केबिनेट मंत्रीपदाच्या रूपाने ज्ञानदेव रांजणे आणि जावली तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या मागणीची स्वप्नपूर्ती झाली असून त्याचा आनंद उत्सव रांजणे साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात साजरा केला जाणार आहे.
सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सदरचा स्नेहमेळावा बुधवार १ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता आंबेघर येथे होणार असून, सदर स्नेहमेळाव्यास समस्त जावलीकरांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन ज्ञानदेव रांजणे मित्र समूहाच्या वतीने करण्यात आली आहे. या कार्यक्रमास ना. शिवेंद्रसिंहराजे उपस्थितीत राहणार असून जावलीचे नेते वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, आर पी आय चे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे आदी मान्यवरांसहित जावली तालुक्यातील महायुतीतील पक्षाचे प्रमुख, पदाधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परीषद, विविध कार्यकारी सोसायटीच आजी, माजी चेअरमन, सदस्य, सर्व गावचे सरपंच, सदस्य, मेढा नगरपंचायतीचे पदाधिकारी, तसेच महीला मोठ्या संख्येने उपस्थितीत राहणार आहेत.
सदर कार्यक्रमवेळी कोणत्याही प्रकारची सभा अथवा भाषण होणार नाहीत फक्त स्नेह मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. तसेच वाढदिवसाला येताना कोणीही हार, बुके, शाल, श्रीफळ अथवा कोणतीही भेट वस्तू घेवून येवू नये अशी विंनती श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले विचार मंच, ज्ञानदेव रांजणे साहेब मित्र समूह जावली यांच्या वतीने युवा नेते सागर धनावडे यांनी केली आहे.