कॅबिनेट मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांचे सातारा जिल्ह्यासह जावलीचे प्रवेशद्वार कुडाळ मधे होणार भव्य स्वागत – सौरभ शिंदे
कुडाळ ता. २१ – महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. नामदार श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांचे सातारा जिल्ह्यातील कुडाळ येथे भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांनी दिली.
कुडाळ जि.प. गटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्वागत सोहळ्याचा शुभारंभ रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024, रोजी दुपारी 12:00 वाजता बाजार पेठ, कुडाळ येथे होणार आहे.यावेळी मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात सर्व गावकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले असून, नागरिकांना आपल्या कॅबिनेट मंत्र्यांचे सत्कार करण्याचा एक अद्वितीय संधी मिळणार आहे. यानिमित्ताने कुडाळ वासियांना विनंती करण्यात येत आहे की, समारंभात प्रचंड प्रमाणात उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा तसेच महाराजांचे सत्कार करण्याची संधी घ्यावी,
समारंभाच्या आयोजनात मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, कार्यकर्ते, आणि विविध संघटनांचे सहकार्य असणार आहे.सर्व नागरिक दुपारी 12:00 वाजता बाजार पेठेत हजर राहून या भव्य समारंभाचा हिस्सा बनून त्याचा आनंद घ्यावा, समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवेंद्रराजे भोसले मित्र समूह, जावळी यांच्या वतीने हा सार्वजनिक आवाहन करण्यात आले आहे.सर्वांनी सामूहिकपणे सहभाग नोंदवून या ऐतिहासिक स्वागत समारंभाला एक आदर्श ठरवावा, अशी विनंती करण्यात आली आहे आहे.बाबाराजे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व तमाम तालुक्यातील जनतेने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी केले आहे