परभणी जिल्ह्यातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करा : किरण बगाडे
किरण बगाडे यांनी जावली तहसीलदार सो, व स. पो. नि.मेढा यांना निवेदनाद्वारे केली मागणी
कुडाळ ता. 13 -भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला संविधान दिले. संविधानाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अन्याय अत्याचार, महापुरुषांची विटंबना, संविधानाची विटंबना,, हे सातत्याने घडत आहे त्याच संविधानामुळेच नागरिकांना हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले त्याच संविधानावर आज संपूर्ण देश चालतो मात्र परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाची प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या त्या माथे फिरू चे हे कृत्य निंदनीय आहे त्याच्या पाठीमागे मास्टर माईंड कोण आहे याचा पोलीस प्रशासनाने तपास करावा व अशा प्रवृत्तींना जागीच ठेचून काढावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी
यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष आयु.किरण दादा बगाडे, प्रवीण चव्हाण, सयाजी भिसे सुरज भिसे सुरज चव्हाण अमोल गंगावणे,रोहित परिहार सूर्यकांत जाधव जितू सोनवणे शंकर भिसे व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.