कुडाळ ता. २- महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक तथा पक्षप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंदापूर मधील पक्ष कार्यालयामध्ये प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक कार्याची संघटन वाढीची दखल घेऊन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आयु किरण बगाडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सोनवणे म्हणाले की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संघटन संपूर्ण महाराष्ट्रात असून गाव तिथे शाखा शाखा तिथे कार्यकर्ता हे ब्रीदवाक्य घेऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संघटन मजबूत करावेशोषित पीडित लोकांच्या अडिअडचणी सोडवण्या साठी कायम तत्पर असणे गरजेचे आहे कार्यकर्ता घडला पाहिजे कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे या उद्देशाने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष काम करत आहे
यावेळी किरण बगाडे म्हणाले की गेली 13/14 वर्षे मी चळवळीत काम करत असूनमाझं योग्य सन्मान महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून झाला असून शोषित पीडित शेतकरी यांच्या समस्या सोडवण्या साठी कायम संघटन वाढवणार गाव तिथे शाखा शाखा तिथे कार्यकर्ता हा निर्माण करण्यासाठी सर्व अठरापगड जाती बारा बलूतेदारांना आणि सर्वांना एकत्र घेऊन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संघटन मजबूत करणार
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक तथा पक्षप्रमुख आयु संजय भैय्या सोनवणे यांच्या हस्ते महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्षपदी आयु किरण बगाडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी अनिल कडाळे जिल्हा उपाध्यक्ष पुणे व इंदापूर तालुका चे पदाधिकारी, तसेच सातारा जिल्ह्यातील विजय सातपुते सयाजी भिसे सुरज भिसे शंकर भिसे अमन चव्हाण अभिजीत शिंदे मंगेश चव्हाण विपुल मिश्रा व पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते