जावळीराजकीय

म्हसवे गटातून आमदार शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्य द्या – सौ.वेदांतिकाराजे भोसले : आखाडे येथील महिला मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद

कुडाळ ता. १७ – जावली तालुक्यातील प्रत्येक गावात,वाडी वस्ती पर्यंत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महायुतीच्या माध्यमातून विकासकामे केली आहेत, महाराज साहेबांनी विकास कामे करताना सातारा जावली त कधीही दूजाभाव केला नाही,किंबहुना जावळीला नेहमी झुकते माप दिले आहे, येत्या २० तारखेला बाबाराजे यांना विक्रमी मतदान करून निवडून द्या असे आवाहन श्री. छ. वेदांतिकाराजे भोसले यांनी यावेळी बोलताना केले.


आखाडे ता.जावली येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्राचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात श्रीमंत.सौ.वेदांतिकाराजे भोसले बोलत होत्या, पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सातारा शहर व ग्रामीण मध्येच माझ्यावर प्रचार जबाबदारी असताना अरुणा शिर्के यांच्या आग्रहाखातर आणि तुम्हाला भेटण्यासाठी माझी ही या गटातील पहिलीच सभा आहे तसेच लाडकी बहिण योजना,उज्वला गॅस योजना शेतकऱ्यासाठी वीज बिल माफी या भाजपा सरकारने केली आहे तसेच आमदार श्री. छ. शिवेद्रसिंहराजे यांनी सातारा तालुक्याच्या विकासा बरोबरच जावलीचा विकास केला प्रत्येकाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले .


मेळाव्यास सुरुवातीला पाऊस आल्याने पावसा सारखे मतदान महिलांनी द्या असे आवाहनही त्यांनी केले .अरुणा शिर्के यांनी मनोगत व्यक्त करताना प्रथम वहिनीसाहेब यांचे मेळाव्यास उपस्थितीबद्दल मनापासून आभार व्यक्त केले तसेच छत्रपती घराण्याची सईबाई सारखे व्यक्तिमत्त्व आपणा सर्वांना भेटण्यास प्रचंड धावपळ असून आल्या आहेत याचा मान राखून तसेच बाबाराजे कधीही महाराज म्हणून वागत नाहीत तर सर्वसामान्यांच्या भूमिकेत असतात म्हणूनच बाबाराजे हाच आमचा पक्ष आणि ते सांगतील तेच आमच्या स्वराज्याचे तोरण आणि धोरण असेल, म्हसवे जिल्हा परिषद गटातून वसंतराव मानकुमरे भाऊ यांचे मार्गदर्शनातून शिवेद्रसिंहराजे भोसले यांना महिलांच्या माध्यमातून प्रचंड मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.
यावेळी मान्यवरांचे स्वागत मेरी इंजल्स स्कूल चे श्री.करण यशवंत पवार यांनी केले. तर प्रास्ताविक सरपंच परिषद राज्य उपाध्यक्ष समाधान पोफळे यांनी केले.यावेळी मनोगत नितीन गावडे, यांच्या सह अनेकांनी व्यक्त केले यावेळी बाजार समिती संचालिका योगिता शिंदे, धनश्री तरडे, वैशाली पांगरे यांच्या सह अनेक महिला उपस्थित होत्या मेरी एंजल स्कूलच्या अध्यक्ष क्रांती पवार यांनी आभार मानले. मेळावा यशस्वी होनेसाठी श्री. सरपंच समाधान पोफळे ,श्री.अजय शिर्के, अजय पाडले तसेच वैशाली पांग रे श्री मारुती शिर्के, अमित पवार श्री.रणजित शिंदे,विक्रम शिंदे ,संदीप निकम,राजू महाडिक,विकास धोंडे ,जीवन भोसले इत्यादी यांनी प्रयत्न केले..तसेच सूत्र संचालन प्रमोद पवार सर यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button