जावळीसामाजिक

कुडाळला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ कँम्पला महिलांचा उदंड प्रतिसाद ; आमदार शिवेंद्रराजेंच्या मार्गदर्शनाखाली सैारभबाबा शिंदे युवा मंचच्या वतीने आयोजन

कुडाळ ता. 3 – राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्या नुसार महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची गर्दी होत असल्याने व आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी मेढा येथे जावे लागत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात महिलांची दाखल्यांसाठी होणारी धावपळ व गैरसोय होऊ नये या उद्देशाने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार व तहसिलदार हणमंत कोळेकर यांच्या सहकार्याने कुडाळ ता.जावळी येथे बुधवार ता. 3 रोजी सैारभबाबा शिंदे युवा मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या कँम्पला महिलांनी प्रचंड गर्दी केल्याने या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या प्रतिसादाबद्दल प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे यांनी आमदार भोसले यांच्यासह प्रशासनाचे व महिलांचे आभार मानले.

कुडाळ ता.जावळी येथे बुधवार ता. 3 रोजी योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रती महिना देण्याची घोषणा केल्यानंतर आता 1 जुलै पासून हे अर्ज भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली आहे. या कँम्पमध्ये तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी उपस्थित राहून या योजनेबाबत महिलांना फाँर्म भरण्यासाठी मदत केली व आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी महिलांना फाँर्मचे वाटपही करण्यात आले. एकाच छताखाली सर्व माहीती, फाँर्म व दाखले उपलब्ध झाल्याने महिलांना या कँम्पचा मोठा फायदा झाला. यावेळी सैारभबाबा शिंदे युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी आवश्यक ती मदत करून सहकार्य केले व कँम्प यशस्वी केला. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य, कुडाळ विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी व संचालक तसेच ग्रामस्थ, युवक उपस्थित होते.

नक्की वाचा – कोणत्या महिलांना मिळणार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
ज्या पात्र महिला आहेत त्याना हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येईल. योजनेचे अर्ज पोर्टल,मोबाइल अॅप,सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात जावून अर्ज करता येईल. अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवाशी असणे गरजेचे आहे. शिवाय त्याला अर्जा सोबत आधारकार्ड, रेशनकार्ड , उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक आणि फोटो आवश्य लागणार आहेत. त्याच बरोबर योजनेच्या अटी शतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रही द्यावे लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पुर्ण पणे विनामुल्य असेल. शिवाय अर्ज करताना त्या महिलेने प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button