कुडाळ ता. 24 – स्पर्धेच्या युगातही जावली सारख्या ग्रामिण भागातील बँकेने मुंबई सारख्या शहरात स्वताचे स्थान निर्माण करून ‘ग्राहक व सभासदांना अविरत व तत्पर सेवा दिल्याने जावली बँकेची विश्वासार्हता आजही टिकून आहे. मुंबई सारख्या मेट्रो शहरात आपले स्थान टिकवून ठेऊन कोरोना काळानंतर सलग तीन वर्षे तोट्यात असणाऱ्या बँकेने फिनिक्स पक्षाप्रमाणे आपली भरारी घेऊन यंदाच्या वर्षात साडे आठ कोटींचा नफा प्राप्त करून सभासद व ग्राहकांचा विश्वास यानिमित्ताने अधिक दृढ केला असल्याचे मत विधानपरिषदेचे आमदार व बँकेचे मार्गदर्शक शशिकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
डीएमके जावळी सहकारी बँकेची एक्कावनावी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. सभेस माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ आोंबळे, बाजार समितीचे सभापती जयदिप शिंदे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष विक्रम भिलारे, उपाध्यक्ष चंद्रकात दळवी, माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे, प्रकाश मस्कर यांच्यासह अनेक मान्यवर व संचालक मंडळ उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, कोरोना नंतर बँक अडचणीत आली होती मात्र योग्य व अनुभवी संचालकांच्या हातात बँकेची सुत्रे असल्याने
आर्थिक संकटातून बँक बाहेर आली,राजकारण विरहित बँकेचे कामकाज सूरू असून आम्ही सर्व नेतेमंडळी येथे नाममात्र आहोत,बँकेवर खरी कृपा ह.भ.प. कळंभे महाराजांचीच आहे, गतवेळी प्रमाणेच यापुढील सर्व निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
माजी आमदार सदाशिव सपकाळ बोलताना म्हणाले, बँकेची निवडणुक बिनविरेध करून सभासदांनी संचालक मंडळावर जो विश्वास दाखविला तो विश्वास बँकेला पुन्हा नफ्यात आणून सार्थ ठरवून दाखवला, बँकेच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले, बँकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे बोलताना म्हणाले, बँकिग क्षेत्रात स्पर्धात्मक आव्हाने उभी ठाकलेली आहेत. कोरोना सारख्या अडचणीच्या काळात बँक काही प्रमाणात मागे गेली, तसेच तीन वर्षात झालेला तोटा हा तांत्रिकदृष्टया झालेला तोटा होता, आज साडे आठ कोटींचा निवळळ नफा मिळवून बँकेने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे, यापुढे भावनिकतेला महत्व न देता कतृत्वाला महत्व देऊन बँकेच्या मुख्य शाखेची जागा बदलण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली, तसेच बँकेच्या विस्तारीकरणाचा विचार करून बँकेत तज्ञ कर्मचार्यांची भरती करण्याबाबतची मागणीही केली. कोरोना काळात तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनी केलेल्या धाडसी व सुयोग्य कामकाजाचे त्यांनी आवर्जून कैातुकही केले.
बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे बोलताना म्हणाले, तोट्यात गेलेल्या बँकेला पुन्हा नफा मिळवून देण्यासाठी संचालक मंडळाबरोबरच बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे येगदान असल्याचे त्यांनी नमूद करून बँकेचा व्यवसाय अधिकाधिक वाढवून बँकेला शेड्युल बँकेचा दर्जा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे सांगितले, यावेळी प्रतापगडचे अध्यक्ष सैारभ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला.
प्रारंभी ह.भ.प दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. संचालकांनी सभेचे नोटीस वाचन केले. यावेळी बँकेच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभासदांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देखील संचालकांकडून देण्यात आली. संचालक वसंत तरडे यांनी सुत्रसंचालन केले तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास लालवाणी यांनी आभार मानले. यावेळी बँकेचे सर्व संचालक मंडळ, कमर्चारी, सभासद, खातेदार उपस्थित होते.