कुडाळ ता. 24 – म्हसवे ता.जावळी येथील सकाळ पेपर समूहाच्या तनिष्का बचत गट आणि विराट कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमा सणाचे अैचित्य साधून वृक्षसंवर्धन दिन दिमाखात पार पडला
आशिया खंडातील दोन क्रमांकाचे झाड आणि वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ज्याची नोंद आहे असा वडाचे म्हसवे गावातील वडाच्या झाडाचा परिसर आणि त्यामुळे लोकप्रिय झालेल म्हसवे गावात त्याच वटवृक्षाचे संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी वटपौर्णिमे निमित् सर्व वडाच्या झाडांचा सन्मान करण्यात आला. हीच ओळख वाढवण्यासाठी वटपौर्णिमा औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण, महिलांसाठी मनोरंजनाचे खेळ आणि विजेत्या 2 महिलांसाठी बक्षीस स्वरूपात पैठणी, उपविजेत्या महिलांना मानाच्या साड्या आणि येणाऱ्या प्रत्येक महिलेस भेटवस्तू असे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास प्रसिद्ध मराठी- हिंदी सिनेमा कलाकार आणि वृक्षप्रेमी सन्माननीय सयाजी शिंदे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय मिलिंद शिंदे , (मुख्यमंत्री समन्वयक) समाजसेविका सौ.राजश्री शिर्के-येवले (महाराष्ट्र प्रदेश मागासवर्गीय बेकारी निवारण संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष), सन्माननीय ए.पी.गंबरे साहेब (सातारा वनविभाग वनपरिक्षेत्र मेढा) सन्माननीय बाळासाहेब शिंदे साहेब(नाम फाउंडेशन समन्वयक पश्चिम महाराष्ट्र),सन्माननीय गणेश सकंपाळ साहेब,प्रतिनिधी नाम फाउंडेशन, उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आणि वडाचे म्हसवे गावच्या वडाच्या झाडांची महती सर्वदूर पोहोचवण्या साठी सर्वांचे बहुमूल्य योगदान मिळाले. सदर कार्यक्रमासाठी बारटक्के अँड सन्स कुडाळ आणि भैरवनाथ टेक्सटाइल पाचवड यांचेकडून प्रत्येकी 1 पैठणी मदत मिळाली. राजेश्रीताई येवले, *ग्रामस्थ मंडळ म्हसवे, लक्ष्मी रेसिडेन्सी विंग अ 3 रा मजला खोली नंबर 304/305 भायखळा ए पी आऊटलाईन यानी विशेष सहकार्य केले. तसेच *स्वर्गीय हिंदुराव (तात्या) शिर्के यांच्या स्मरणार्थ व्योम वैभव शिर्के यांनी मुलांना स्पोर्ट् ड्रेस चे वाटप केले पैठणी विजेत्या प्रथम क्रमांक सौ. सरिता वैभव शिर्के, द्वितीय क्रमांक सौ.रूपाली सुरेश शिर्के तर मानाची साडी विजेत्या सौ.पूजा संदीप सावंत आणि सौ.पूजा पंकज शिर्के ठरल्या.
प्रास्ताविक श्री.जितेंद्र शिर्के सर यांनी केले. सौ.संध्या शशिकांत शिर्के यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्र संचालन करत कार्यक्रम सर्वोच्च पातळीवर नेवून ठेवला.तनिष्का गट यांनी नाम फाउंडेशन, वनविभाग, कृषी विभाग आणि मुख्यमंत्र्यांचे आरोग्य सहायक या सर्वांना एकाच मंचावर आणण्याचा सुवर्णयोग साधत गावच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले, आणि अशीच सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प केला. आणि कार्यक्रम संपन्न झाला.