कुडाळ ता. 27 – महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्यावतीने २०२४ मध्ये देण्यात येणारा दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर अँवॉर्ड समारंभ गोवा येथे नुकताच संपन्न झाला, यावेळी दांडेघर येथील सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातीलकार्यकर्ते तसेच जावली सहकारी बँकेचे माजी संचालक विनोद कळंबे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पणजी (गोवा) येथे रविवार, ता. २६ मे रोजी दीनानाथ मंगेशकर कला अकादमी दि प्राईड ऑफ इंडिया भास्कर अँवॉर्ड हा शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्येष्ठ साहित्यिक विनायक खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजतिलक नाईक, जर्नालिस्ट फौंडेशनच्या महिला विभागाच्या अध्यक्षा सौ. मनीषा लोहार आदींच्या प्रमुख उपस्थित मान्यवरांना भास्कर पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील लोककलाकारांचा लावणी महोत्सव कार्यक्रही सादर झाला, या संपुर्ण सोहळ्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजीव लोहार व उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर यांनी दिली.
दांडेघर येथील सामाजिक कार्यकर्ते असा लौकिक असलेले विनोद कळंबे हे आपले आजोबा व जावली बँकेचे संस्थापक दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना धार्मिक, सामाजिक, राजकीय व बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या स्वतःच्या कामाने वेगळा ठसा उमटविला आहे, असे प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या कळंभे यांच्या कार्याचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला आहे. कार्यक्रमानंतर आजपर्यंत ह.भ.प कळंभे माहारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन केलेल्या निस्वार्थी सामाजिक कार्याची पोहचपावती या पुरस्काराने मिळाली असून यापुढील काळातही अधिक जोमाने समाजकार्य करण्याची उर्जा यानिमित्ताने मिळाली असल्याची सदभावना विनोद कळंभे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.