आसनी मधे बिबट्याच्या वावर – कुत्र्यांसह पाळीव प्राण्यांवर हल्ला : वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची सागर धनावडे व ग्रामस्थांची मागणी
कुडाळ ता. 26 – जावली तालुक्यातील आसनी येथे गेले चार दिवस बिबट्याने धुमाकूळ घातला असून गावातील कुत्र्यांचा फडशा पाडला आहे एवढेच नव्हे तर रात्री अकराच्या सुमारास नागरिकांना गावातच बिबट्याने दर्शन दिले असून बिबट्याचा वावर व दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
जावली तालुक्यातील आसनी गावाला लागूनच डोंगर रांगा आहेत तसेच महाबळेश्वर वरून सातारला जाणारा राजमार्ग या गावाच्या वरूनच जातो बऱ्यापैकी जंगल क्षेत्र असल्याने या भागात बिबट्यांचा वावर अधून मधून आढळून येतो मात्र जंगलात त्यांना खायला काही मिळाले नाही की बिबटे शेजारील गावात आक्रमण करतात तसेच आक्रमण गेली चार दिवस या बिबट्याने आसनी गावावर केले असून अद्याप या बिबट्याने कोणावर हल्ला केला नसला तरी गावातील कुत्र्यांचा मात्र फडशा पाडला आहे काही ग्रामस्थांना रात्री अकरा वाजता गावातच या बिबट्याने दर्शन दिल्याने ग्रामस्थ भयभीत झाली आहेत. गावातील माणसांवर हल्ला करण्याआधीच वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आसनी येथील सामाजिक कार्यकर्ते सागर धनावडे व ग्रामस्थांनी केली आहे