आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मेढ्यातील मानकुमरे पॉईंट येथे तमाम जावलीकरांच्या वतीने आज शुक्रवार दि. २९ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आ शिवेंद्रसिंहराजे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सातारा जि. प. माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे तसेच प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सैारभ शिंदे आदी मान्यवरांनी दिली आहे .जावली तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी गावागावात खेडोपाड्यात विकासाची गंगा पोहोचवली त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी तमाम जावलीकरांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार दि. २९ रोजी सायंकाळी पाच वाजता वाढदिवस कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या कार्यक्रमात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार करण्यात येणार आहे
या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी मानकुमरे यांच्या वसंतगडावर तालुक्यातील मान्यवर मंडळीची बैठक झाली. या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन ठरवण्यात आले. सातारा जावलीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा ३० मार्च रोजी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला जाणार आहे. तर, जावली तालुक्यातील जनतेच्या वतीने दि. २९ मार्च रोजी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रम स्थळी सायंकाळी ५ वा.आ. शिवेंद्रसिंह राजे मानकुमरे पॉईंटवर शुभेच्छा स्वीकारणार आहेत.तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सैारभ शिंदे , माजी उपसभापती हणमंतराव पार्टे, जयदिप शिंदे,सागर धनावडे,समीर आतार यांनी केले आहे.
टिप :- कोणतही सभा अथवा कार्यक्रम होणार नाही आलेल्या सर्व लोकांच्या शुभेच्छा महाराज साहेब स्विकारणार आहेत तसेच वयक्तिक संवाद साधणार आहेत तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.