कुडाळ ता. 22 – हाडांची ठिसुळता ही वयाच्या चाळीशीनंतर स्त्री व पुरुष या दोघांमध्ये आढळते. हाडाची ठिसुळता म्हणजे हाडांतील कॅल्शिअम कमी होऊन हाडे ठिसूळ व कमकुवत बनतात आणि यामुळे पुढे वरचेवर फ्रॅक्चर व सांधेदुखीचे वयाबरोबर वाढलेले प्रमाण वाढते. स्त्रीयांना रजोनिवृत्तीनंतर वाढत्या वयाबरोबर हाडातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झालेले आढळते. याच पार्श्वभूमीवर धन्वंतरी डिस्ट्रीबुटर्स यांच्या वतीने पाचवड ता. वाई येथील सह्याद्री हाँल येथे बुधवार दि. २१/०२/२०२४ रोजी सकाळी १०.३० ते ५ या वेळेत मोफत हाडांच्या आजारांची तपासणी शिबिर संपन्न् झाले, या शिबिरात 70 हून अधिक नागरिकांनी तपासणी करून घेतली व शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद दिला.
सदर शिबिर निष्क्रिय जीवन शैली, सांधेदुखी व पाठदुखीने त्रस्त रोगी, खुप दिवसांपासुन औषधगोळ्या घेत असलेले रूग्ण, 18 वर्षाच्या पुढील महिला-पुरूष यांच्यासाठी उपयुक्त ठरले. या मोफत शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. यावेळी गरजेनुसार काही रूग्नांना फिजिओथेरपी सुध्दा देण्यात आली. त्याचाही लाभ अनेकांना झाला, यावेळी कार्यक्रमास स्वाती जितेंद्र तरडे, धनश्री तुषार तरडे, अश्विनी मनोज शेवाळे, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स, नितीन खरात सर एक्झिक्युटिव्ह डायमंड आरोग्य सल्लागार, डॉक्टर पद्मश्री प्रफुल चोरगे बी ए एम एस, प्रदीप दादा चोरगे नगरसेवक वाई, महेश गायकवाड, सरपंच पाचवड, अजित शेवाळे उपसरपंच पाचवड यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित रहावे. स्वाती तरडे यांनी सर्वांचे स्वागत केले.तर धनश्री तरडे यांनी सर्वांचे आभार मानले.