कुडाळ ता.8 – मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या सग्या-सोयऱ्यांना कुणबी दाखला देण्याचा निर्णय जारी केल्यानंतर सरकारने मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या जारी केलेल्या अध्यादेशावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती घेतल्या जाणार असल्याचे अध्यादेशात म्हटले होते. त्यानुसार ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने हरकती पाठवण्याची छगन भुजबळ यांनी आवाहन केले होते त्याला कुडाळ ता.जावळी येथील आोबीसी समाजाने प्रतिसाद देत तब्बल 2 हजार हरकती पत्रे आज पोस्टाद्वारे पाठवण्यात आली.
मराठा आरक्षणाच्या या नवीन नियमामुळे बाधा पोहोचत असलेल्या व्यक्तींची हरकत लक्षात घेऊन त्यानंतर या अध्यादेशा संबंधित कोणतीही व्यक्ती किंवा कोणत्याही हरकती प्राप्त झाल्यास, त्याआधी 16 फेब्रुवारीपर्यंत आलेल्या हरकती सरकारकडून विचारात घेण्यात येणार आहेत, त्यामूळे ओबीसी समाजाने हरकती पाठवण्याचे आोबीसी नेते छगन भुजबळ यांनी आवाहन केले होते, जावळी तालुक्यातून त्यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत गावातील आोबीसी समाज बांधवांनी घरोघरी जाऊन याबाबत जनजागृती केली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने कुडाळ सारख्या एका गावातूनच तब्बल 2 हजार हरकती पत्रे राज्य शासनाला पोस्टाव्दारे पाठवण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने आोबीसी बांधव, युवक उपस्थित होते.
चैाकट – आमच्या हरकतींमुळे सरकारला दुसरी बाजू कळेल – श्री.लक्ष्मण नायकुडे ,कुडाळ
जुन्या नोंदीवरून कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अध्यादेश म्हणजे ‘ही एक सूचना आहे, ज्याचं रुपांतर नंतर होणार आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत या राज्यपत्रावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार लाखोंच्या संख्येने सरकारकडे हरकती पाठवण्यात येणार असून कुडाळ मधील ओबीसी समाजाच्या वतीने सुद्धा 2 हजार हरकती पाठवण्यात आल्या आहेत. आमच्या हरकतींमुळे सरकारला दुसरी बाजूही लक्षात येईल.