कुडाळ ता. 3 – कुडाळ जिल्हा परीषद प्राथमिक केंद्र शाळेच्या नूतन इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून लवकरच शाळेसाठी नविन उमारत उभी राहणार आहे,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून एक कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने आता कुडाळ गावाला प्राथमिक शाळेची सुसज्ज इमारत विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शाळेतील एक इमारत नादुरुस्त होती व धोकादायक झाली होती, पावसाळ्यात संपुर्ण इमारत गळत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत होत्या, सदरची धोकादायक इमारत लवकरात लवकर पाडावी व त्या ठिकाणी नविन इमारत बांधून शिक्षणाची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणीही पालक व ग्रामस्थांकडून होत होती, सदरच्या इमारत धोकादायक झाल्याने त्याचे गांभिर्य आोळखून प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सौरभ शिंदे यांनी कुडाळ गावात असणारी जुनी प्राथमिक शाळेची इमारत सुसज्ज असावी, आधुनिक असावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निधी बाबत मागणी केली होती., या निधीच्या माध्यमातून नविन इमारत होणार असल्याने पुर्वीची धोकादायक इमारतीचे निर्लेखन करण्यात आल्याने इमारत पाडण्याचे कामही सूरू करण्यात आले आहे, या कामाची पाहणी सुध्दा सैारभ शिंदे यांनी करून पुढील काम व्यवस्थित व सुसज्ज करण्याच्या दृष्टीने संबंधिंताशी चर्चा केली, गावाच्या दृष्टीने महत्वाचे काम सूरू झाल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व सौरभबाबा शिंदे यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.