कुडाळ ता.25- सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय लालसिंगराव शिंदे काका यांची ९८ वी जयंती २६ जानेवारी रोजी साजरी सोनगाव येथील प्रतापगड कारखाना कार्यस्थळावर संपन्न होत असून, या जयंती दिनी अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या २०२३-२४ गळीत हंगामाच्या दोन लाख साखर पोत्यांचे पूजन होणार आहे.जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भव्य रक्तदान शिबिर तसेच कृषी तज्ञांचे मार्गदर्शन देखील आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रतापगड कारखानाचे चेअरमन सौरभबाबा शिंदे यांनी यावेळी दिली.
प्रशासन ऑफिस प्रतापगड सहकारी साखर कारखाना येथे सक्तदान शिबिर घेण्यात आले आहे.हे शिबीर सकाळी ९ ते ४ यावेळेत होणार आहे.तर २ लाख साखर पोत्यांचे पूजन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
कार्यक्रमास माजी अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा शिंदे, साैरभ बाबा शिंदे, चेअरमन प्रतापगड सहकारी साखर कारखाना ,व्हाईस चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर, प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे, अजिंक्यतारा साखर कारखाना चेअरमन यशवंत साळुंखे,व्हाइस चेअरमन नामदेव सावंत,कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, यांच्यासह प्रतापगड व अजिंक्यतारा साखर कारखाना सर्व संचालक, तालुक्यातील विविध राजकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता साखर पोत्यांचे पूजन कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांनी केले आहे.