कुडाळ ता. 13 – खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांचे विश्वासू सहकारी आणि कट्टर हिंदुत्ववादी भाजपाचे जावली तालुक्यातील आखाडे गावचे जेष्ठ कार्यकर्ते सयाजीराव शिंदे यांची सातारा जिल्हा भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे खा. श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिंदे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
सयाजीराव शिंदे हे १९८८ पासून खा. उदयनराजे भोसले यांचे घनिष्ट आणि विश्वासू सहकारी समजले जातात.एक उच्चशिक्षित राजकीय राजकारणी म्हणून त्यांचा राजकारणाचा दांडगा अभ्यास आहे.तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग दिसून येतो.१९८५ ते १९८८ पर्यंत त्यानीअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य केले.१९९० ते १९९२ ही दोन वर्षे त्यांनी भाजपा युवा मोर्चाचे सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहिले.१९९३ ते १९९७ भाजपाचे सातारा जिल्हा चिटणीस पदी त्यांची निवड झाली होती.१९९८ ते २००६ असे भाजपाचे जावली तालुका अध्यक्ष म्हणून काम केले.२०१० मध्ये त्यांची विश्व हिंदू परिषद पदाधिकारी पदी निवड झाली त्यानंतर पुन्हा त्यांची २०२० ते २०२३ आहे भाजपाच्या सातारा जिल्हा चिटणीसपदी निवड झाली होती आणि आता नुकतीच सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी त्यांची सातारा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.
निवडी नंतर सयाजीराव शिंदे यांचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील,खा.उदयनराजे भोसले,आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.जयकुमार गोरे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी आ.मदनदादा भोसले, जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि अर्थ समितीचे माजी सभापती सुनील काटकर,श्रीकांत आंबेकर आदींनी अभिनंदन केले. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी माझ्यावर जिल्हा उपाध्यक्ष पदाची टाकलेली जबाबदारी मी सार्थ करून दाखवेन व सातारा जिल्हा भाजपामय कसा होईल यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्नशील राहणार असल्याचे सयाजीराव शिंदे यांनी बोलताना सांगितले.