कुडाळ ता. 13 – जावळी तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी नंदकुमार तात्याबा धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या दिड वर्षांपुर्वी जावळी तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध करण्यात संचालक मंडळाला यश आले होते, या निवडणुकीवेळी 17 संचालकांची निवड बिनविरोध करण्यात आली होती त्यामध्ये तालुक्यातील सर्व विभागातील सभासदांमध्ये समन्वय साधून संधी देण्यात आली होती.
कुडाळ येथील संस्थेच्या मुख्य कायार्लयात आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी निवडीवेळी नंदकुमार तात्याबा धुमाळ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी जाहीर केले. निवडीनंतर प्रतापगड कारखान्याच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुनेत्रा शिंदे तसेच कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सैारभ शिंदे यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बोलताना प्रतापगडचे अध्यक्ष सैारभ शिंदे म्हणाले, स्वर्गीय लालसिंगराव शिंदे व स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांच्या विचारांवर तसेच सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करून आम्ही जिल्हयातील सहकारात चांगला आदर्श निर्माण केला होता.
ही संस्था अत्यंत सुस्थिततित सुरू आहे, त्यामुळे संघाच्या माध्यानमातून चांगला कारभार करणे संचालक मंडळाला शक्य झाले आहे, पदाधिकारी फेरनिवडी करून सर्व संचालकांना संधी देण्याचा यानिमित्ताने संस्थेचा प्रयत्न असून, सहकारातील संस्था सुरळीत चालवणे व वाढवणे ही आमच्यासह सर्व संचालक सभासदांची जबाबदारी आहे, ती आम्ही आगामी काळातही व्यवस्थितपणे पार पाडू असा विश्वासही यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी संचालक, अधाकरी वर्ग व कमर्चारी उपस्थित होते. व्यवस्थापक दिलिप पवार यांनी सर्वांचे आभार मानले.