जावळीजिह्वासामाजिक

जावळीतील हजारो विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ -शाळा-महाविद्यालयातून व्यसनमुक्त संघाच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद.

कुडाळ ता. 2 – सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करीत असताना व्यसनाची वाढत चाललेली प्रतिष्ठा, बिभस्तपणाचे होत असलेले प्रदर्शन आणि रात्रभर मद्यपान करण्यास सरकार कडून दिली जाणारी खुली परवानगी देशाच्या युवापिढीसाठी व भावी पिढीसाठी घातक असून याचा बालमनावर होणारा परिणाम लक्षात घेवून नववर्षाची सुरवात “व्यसनमुक्तीची संकल्प शपथ” घेवून करा असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघाचे वतीने करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत जावळी तालुक्यातील शाळा- महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त रहाण्यासाठी संकल्प शपथ घेवून व्यसनमुक्तीचा नारा दिला आहे.


बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेने गेली २५ वर्षे व्यसनमुक्तीसाठी सातत्याने झगटत असलेली व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दरवर्षी ३१ डिसेंबरला “दारू नको दुध प्या” हा उपक्रम राज्यभर राबविला जातो. २०२२पासून व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक विलासबाबा जवळ यांचे संकल्पनेतून व राज्याध्यक्ष दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संकल्प शपथ देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

यासाठी गेले २० दिवस प्रत्येक शाळेला भेटी देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते सक्रियपणे काम करीत होते.यावेळी राज्यातील सोलापूर,पूणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,अहमदनगर,संभाजीनगर,जळगाव,नाशिक,बीड,वाशिम, धाराशिव,लातुर अशा अनेक जिल्ह्यांसह शहरी भागात असणार्‍या शाळा- महाविद्यालयातून या चांगल्या ऊपक्रमाला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक शाळा महाविद्यालयांमधून व्यसनमुक्त संघाचे व्याख्याते प्रा.धनंजय देशमुख, प्रा.मारूती शेळके, तानाजी पांडूळे, बाळासाहेब शेरेकर, युवावक्ते जगन्नाथ शिंदे यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.व्यसनमुक्त युवक संघाने राबविलेल्या उपक्रमाला राज्यभरातून मिळालेला प्रतिसाद पहाता शासनाने याच्यावर गांभिर्याने विचार करायला हवा. १ जानेवारी हा नववर्षाचा प्रथम दिवस व्यसनमुक्ती संकल्प दिन म्हणून जाहीर करावा असे आवाहन व्यसनमुक्त संघाचे मार्गदर्शक शहाजी काळे यांनी केली आहे.


व्यसनमुक्त युवक संघाने राबविलेला उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाक्रमा बरोबरच व्यसनांचे दुष्परिणाम व त्याची दाहकता सांगणे आता काळाची गरज आहे. कॅन्सरच्या हाँस्पिटल मधील सत्य परस्थिती दाखवणे आता गरजेचे झाले आहे. विलासबाबा जवळ – जिल्हाध्यक्ष,व्यसनमुक्त युवक संघ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button