कुडाळ ता. 28 – कुडाळ ता. जावळी येथे बुधवार ता. 20 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर 2023 या कालावधीत श्री दंत मंदिर व श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिर या प्रमुख दोन्ही ठिकाणी भव्य गुरूचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते, यावर्षी पारायणाचे 13 वे वर्षे संपन्न झाले असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कुडाळसह उडतारे, करहर व जावळी तालुक्यातील विविध भागातून येथे वाचक पारायणाला आले होते,
दररोज पहाटे ५ वाजता या पारायणाला सुरूवात करण्यात आली होती सर्व वाचक पहाटे हजर राहून सेवा करत होते. यावर्षी शिंदे यांचे श्री दंत मंदिर पारायण सेहळ्यात 70 वाचक गुरूचरित्र ग्रंथाचे वाचणास उपस्थित होते तर श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिरातील पारायण सोहळ्यात 90 वाचक गुरूचरित्र ग्रंथाचे वाचणास उपस्थित होते दत मंदिरातील पारायणाचे व्यासपीठ चालक म्हणून डाँ राजेंद्र माने यांनी निरूपणाचे कार्य केले.तर पिंपळेश्वर मंदिरात श्री. दिक्षित यांनी निरूपणाचे कार्य केले.
दररोज पहाटे सूरू होणारेपारायण सकाळी साडे आठ वाजेपर्यंत सूरू होते त्यानंतर आरती होऊन त्या दिवसाची सांगताकरण्यात येत होती. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, कुडाळ येथील दोन्हीपारायण सोहळ्यासाठी मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्यात आला होता व मंदिरावर आकर्षकविद्युत रोषणाई करण्यात आली होती, या पारायण सोहळ्यामुळे संपुर्ण गावात भक्तीमयवातावरण झाले होते. पारायण सोहळा यशस्वीतेसाठी अनेक सेवेकरी, भाविक, ग्रामस्थ, महिला,युवा वर्ग मनोभावे आपली सेवा बजावत होते. दत्त जयंती दिवशी श्री स्वामींची पालखी सोहळाउत्साहात पार पडला तर दोन्ही पारायण सोहळ्यात महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी हजारो भिविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.