कुडाळ ता 28 : जावली विभागातील मौजे रामवाडी येथून आज अयोध्येतून अभिमंत्रित केलेल्या अक्षतांच्या मंगल कलशाचे करहर विभागातील गावोगावी मोठ्या भक्तीभावे जोरदार राम भक्तांनी स्वागत केले. श्री राम जन्म भूमी मंदीर निर्माण न्यास यांच्या संकल्पनेतून व सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या मार्गदर्शना खाली राम रथातून अभिमंत्रित केलेल्या अक्षता तसेच प्रभू रामाची प्रतिमा यांचे जावली तालुक्यातील करहर विभागात गावोगावी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.
सातारा जावली विधानसभेचे निवडणूक प्रमुख सातारा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अविनाशजी कदम यांच्या सुचने नुसार भाजपचे जावली तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष भाईजी गावडे यांच्या नियोजनाखाली
रामवाडी येथील श्री राम मंदिरातून आरती करून,सरपंच श्रीरंग गलगले काका व रामवाडी ग्रामस्थ, महिला, वारकरी यांच्या शुभहस्ते कलश व प्रभू रामाची प्रतिमा पूजन करून रथयात्रेची सुरुवात करण्यात आली.
पाडळे सरांनी रथासमोर श्रीफळ वाढवून पूजन केले. पार्टेवाडी, बलकावडेवाडी, गावडेवाडी मार्गे रथयात्रा पिंपळी येथील जागृत श्री दत्त मंदिरात गेली. पिंपळी येथील प्रमोद शिंदे, अविनाश पवार, सरपंच संपत गोळे, अनिल पवार तसेच ग्रामस्थांनी रथ यात्रेतील कलश आणि प्रतिमेचे मोठ्या मनोभावे स्वागत केले. तसेच महिलांनी घरोघरी औक्षण केले. गोळेवाडी मार्गे महू येथे रथयात्रा आली असता महू ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात रथयात्रेचे स्वागत केले. महू येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार व कलशारोहानाचा कार्यक्रम ही आजच असल्यामुळे मुंबईकर ग्रामस्थ महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुजित गोळे, अविनाश गोळे, गणेश गोळे, जय जगताप, माजी सरपंच विठ्ठल गोळे, नारायण गोळे, रांजणे साहेब, रवी शिंदे आदी ग्रामस्थांनी रथयात्रेचे मोठ्या दिमाखात घरोघरी अक्षतांचा कलश आणि प्रभू राम रायाची प्रतिमा घेऊन जाऊन पूजन केले.त्या नंतर दापवडी, बेलोशी, काटवली, शिंदेवाडी, रुईघर गणेशपेठ, रांजणी, वहागांव मार्गे पानस येथील श्री कानिफनाथ मंदिरात सुभाष गुजर, नितीन गोळे, बाळासाहेब गुजर, पोपट गुजर, बाबू गुजर, सुरेश भांदिर्गे अरुण गुजर आदी ग्रामस्थ, वारकरी यांनी रथ यात्रेचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
विवर येथील दत्त मंदिरात रवी पार्टे, प्रवीण पवार, अनिल पार्टे, हरीश पार्टे, राहुल धनावडे, माजी सरपंच विठ्ठल धनावडे तसेच महिलांनी कलश पूजन करून राथाचे स्वागत केले. तेथून कावडी येथील भैरवनाथ मंदिरात सरपंच यशवंत मानकुमरे, नितीन मानकुमरे, उपसरपंच शशिकांत मानकुमरे, शांताराम मानकुमरे, महेश मानकुमरे, महिला ग्रामस्थ यांनी आरती करून पूजन केले.त्या नंतर हातगेघर येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रचंड संख्येने महिला मंडळाने मंगल कळशाची व प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेची आरती करून गावातून मिरवणूक काढली. यावेळी सरपंच सौ. प्रमिला गोळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप गोळे,कमलताई गोळे, जयश्री विसापुरे, पौर्णिमा गोळे, अर्जुन गोळे, रामचंद्र गोळे, प्रकाश गोळे, मनीष गोळे, अभिजित गोळे, सचिन गोळे, तुकाराम गोळे आदी मोठ्या संख्येने महिला, ग्रामस्थ उपस्थित होते. विठ्ठल मंदिरात आरती झाल्यावर श्रीहरी गोळे यांनी 22 जानेवारी च्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. अयोध्येहून अभिमंत्रित करून आणलेल्या अक्षतांचे वाटप सर्वाना करण्यात आले. श्री रामाच्या जायघोषणे संपूर्ण मंदीर आणि परिसर दणणून गेला होता. मोठ्या भावपूर्ण वातावरणात गावोगावी रथयात्रेचे स्वागत केले गेले.