कुडाळ ता. 26 – सातारा आणि जावली मतदारसंघातील अनेक गावातील विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून कोट्यावधी रुपये निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत मोठ्या ग्रामपंचायती नागरी सुविधा पुरीवणे २०२३-२४ च्या अंतर्गत योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला असून त्यामुळे कुडाळ ता.जावळी गावातील अनेक विकासकामे मार्गी लागणार आहेत.
मोठ्या ग्रामपंचायती नागरी सुविधा पुरीवणे २०२३-२४ च्या अंतर्गत सातारा-जावली विधानसभा मतदार संघाचे आमदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातुन १) कुडाळ येथे शिक्षक कॅालनी अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ५,००,०००/-लक्ष २) कुडाळ येथे हाजीमलंग यांचे घराकडे जाणारा रस्ता व गटर करणे.१०,००,०००/-लक्ष असे कामे मंजूर झाली असून लवकरच विकासकामांना सुरूवात करण्यात येणार आहे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यामातून कुडाल व जावळी तालुक्यात कोट्यावदी रूपयांची विकासकामे झाली असून त्याबद्दल कुडाळ ग्रामस्थ यांच्या वतीने मा.आ.श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांचे सौरभबाबा शिंदे व ग्रामस्तांनी आभार मानले आहेत.