कुडाळ ता. 17 – जावळी तालुक्यातील प्रतापगड अजिंक्य साखर उदयोग समूहाच्या वतीने प्रतापगड कारखान्याचे १ लाख टन क्रशिंग पूर्ण झाले असून कमी कालावधीमध्ये १ लाख क्रशिंग झाल्यामुळे कारखान्याचे सभासद, कामगार, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार यांचेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अध्यक्ष सैारभ शिंदे यांचेसह संचालक मंडळाने सर्वांचे अभिनंदन केले.
गेली 4 सिझन बंद असलेल्या कारखान्याची यंदाच्या सिझन पासून मोठ्या जोमाने गाळपास सुरूवात झाली होती, ऑक्टोबर पासून अवघ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ऊस गळीत हंगाम २०२३ चा शुभारंभ होऊन कारखाना चालू करण्यात आला होता.
कारखान्याची देखभाल व दुरूस्ती, ऊस तोडणी वाहतुक यंत्रणाही थोडक्या कालावधीमध्ये उभारणी करून कारखान्याचा गळीत हंगाम धाडसाने सुरू करण्यात आला होता. आज दि.17 डिसेंबर रोजी सकाळी १ लाख क्रशिंग पूर्ण झालेले आहे. कमी कालावधीमध्ये १ लाख क्रशिंग झाल्यामुळे कारखान्याचे सभासद, कामगार, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार यांचेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.येथून पुढेही अशीच कारखान्याची यशस्वी वाटचाल करून 4 लाख मे . टन ऊसाचे गाळप करण्याचे संचालक मंडळाचा मानस आहे. त्यासाठी सर्व सभासद शेतकरी यांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन सैारभ शिंदे यांनी केलेले आहे. तसेच उस दराबाबत देखील चांगला निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा याउद्देशाने कारखान्याने ३००० रुपये दर दिला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३००० रुपये याप्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम ७ कोटी ४२ लाख ६७ हजार ५६८ रुपये एवढी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आली आहे.