कुडाळ ता. 17 – येथील जावळी तालुका आोबीसी समाजाच्या वतीने “ओबीसी आरक्षण बचाव” या विषयावर मंगळवार दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी वाई येथे होणाऱया ओबीसी एल्गार मेळाव्याच्या नियोजनासाठी कुडाळ ता.जावळी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.
वाई येथील होणाऱ्या भटके, विमुक्त, बीसी.आणि ओबीसी एल्गार मेळावा या अनुषंगाने विविध विषय व सभेचे नियोजनाची चर्चा यावेळी बैठकीत करण्यात आली. मंगळवार दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी धनश्री मंगल कार्यालय शहाबाग फाटा वाई येथे ओबीसी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्राध्यापक लक्ष्मणराव हाके मागासवर्गीय आयोग माजी संचालक उपस्थित राहणार आहेत. मा.रुपालीताई पाटील ठोंबरे नगरसेविका पुणे व अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे. तरी सर्व भटके, विमुक्त, बीसी.आणि ओबीसी बांधवांनी मंगळवार दिनांक १९डिसेंबर २०२३ दुपारी १ वाजता धनश्री मंगल कार्यालय शहाबाग फाटा वाई येथे दुपारी १ वाजता बहुसंख्याने उपस्थित राहून आपली वज्रमूठ दाखवून मंत्री छगन भुजबळ साहेब यांचे हात बळकट करावेत असे आवाहनही यावेळी आयोजकांकडून करण्यात आले. तसेच या मेळाव्यासाठी कुडाळ व पंचक्रोषीतील समाज बांधवांनी मंगळवार ता.19 रोजी सकाळी 11 वाजता श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदीर याठिकाणी एकत्र येऊन तेथून दुचाकीची रँली काढून वाई येथे मेळाव्याला जाण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तरी सर्व कष्टकरी बांधवांनी एक दिवस आपल्या लेकरांसाठी व समाजाच्या हितासाठी तसेच आपल्या न्याय हक्कासाठी व आपले आरक्षण टिकवणेसाठी एकत्र येऊया असा संकल्पही यावेळी करण्यात आला आहे.