कुडाळ ता. 24 – सोनगाव ता. जावळी येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा (अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योग समूहाचा) सन 2023-24 चा गाळप हंगाम सध्या जोमाने सूरू आहे, आपला हक्काचा कारखाना सुरू झाल्याने स्थानिकांसह बाहेरूनही चांगल्या प्रमाणात ऊस गाळपासाठी येत आहे दिनांक 30/11/2023 रोजी मोठ्या धाडसाने मा. आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योगास गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रति टन रुपये 2850/- पहिला हप्ता जाहीर करून नंतर योग्य त्या टप्प्यात रिकव्हरीनुसार पुढील हप्ता देण्यात येईल याबाबत ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी निश्चित रहावे, जाहीर केलेला उसाचा प्रति टन रुपये 2850/- हा अंतिम दर नसून हा केवळ पहिला हप्ता आहे हे ऊस उत्पादक सभासदांनी लक्षात घ्यावे,
सातारा जिल्हयातील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक व शेतकर्यांच्या हिताचा विचार करूनच अंतिम दर दिला जाणार आहे तरी सर्व ऊस उत्पादक सभासदांनी व शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता अजिंक्यतारा – प्रतापगड कारखान्याला आपला ऊस घालून सहकार्य करावे व उस दराबाबत निश्चिंत रहावे असे आवाहन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभबाबा शिंदे यांनी केले आहे, यावेळी संचालक दादा पाटील, बाळासाहेब निकम, प्रदीप तरडे उपस्थित होते.