काटवली ता जावली येथील बौद्ध समाजाच्या वस्तीकडे जाणारा रस्ता काही समाजकंटक लोकांनी अडवल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती याबाबत आरपीआयचे जावली तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे व सातारा जिल्हा महिला अध्यक्ष पूजाताई बनसोडे व रिपाईच्या पदाधिकारी यांनी जावली तहसील कार्यालयात येऊन कार्यालयातच मांडी घालून बायका पोरांसहित ठिय्या आंदोलन केल्याने तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांची पूर्णपणे भंबेरी उडाली व ही न्यायप्रविष्ट बाब असली तरी तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी हा रस्ता तातडीने खुला करावा असे आदेश पोलीस प्रशासनाला दिले त्यानुसार मंडल अधिकारी पाटणकर व तलाठी आणि सपोनी संतोष तासगावकर यांनी आदेशाची अंमलबजावणी करत लगेचच हा रस्ता खुला करून बौद्ध समाजाला न्याय दिला .
याबाबत सविस्तर हकीकत अशी की काटवली ता.जावली येथील बौद्ध वस्तीत शेतजमीन गट नंबर 741अ, 737, 735, 733 व 724 या शेताच्या बांधावरून जाणारा रस्ता हा कळकटांचे बॅरिकेट करून दोन ठिकाणी अडवण्यात आला होता त्याबाबत जावली तालुका आरपीआयच्या वतीने तहसीलदार हनुमंत कोळेकर यांना संपर्क साधण्यात आला मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आरपीआयचे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी काटवली येथील बौद्ध समाजाचे नागरिक व पदाधिकारी यांना घेऊन तहसीलदार कार्यालय गाठले व तहसील कार्यालयातच महिलांसह जमिनीवर बसून मांडी घालून ठिय्या आंदोलन केले या आंदोलनाने प्रशासन हडबडून गेले तातडीने याची दखल घेत तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी मंडल अधिकारी व पोलिसांना यांना सदरचा रस्ता तातडीने खुला करण्याबाबत आदेश दिले.
या रस्त्याबाबत तहसीलदारांच्याकडेच सदर रस्ताबाबतचे प्रकरण मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ कलम ०५ अन्वये या कार्यालयाकडे अदयाप न्यायप्रविष्ठ आहे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना देखील बौद्ध समाजाचा रस्ता जाणीवपूर्वक अडवण्यात आला होता बौद्ध समाजाच्या लोकांची दारकोंडीच करण्यात आली होती , जोपर्यंत रस्ता खुला करत नाही तोपर्यंत आम्ही तहसीलदार कार्यालय इथून उठणार नाही अशी भूमिका एकनाथ रोकडे व आंदोलकांनी घेतली त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली तहसीलदार कोळेकर यांनी तातडीने सदरचा रस्ता खुला करण्याचे आदेश पारित करून पोलीस प्रशासनाला त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आणि हा रस्ता अखेर रात्री साडेसात वाजता खुला करण्यात आला तसेच संबंधित रस्ता आडवणाऱ्या लोकांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी रिपाईने निवेदनाद्वारे केली मागणी .
याप्रसंगी रिपाई महिला जिल्हाअध्यक्ष पूजा ताई बनसोडे ,विशाल संकपाळ ,संतोष चव्हाण ,दत्तात्रय जाधव ,किशोर जाधव , सचिन कांबळे ,महेंद्र खरात ,सचिन खरात इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .