कुडाळ ता.25- जावली तालुका पत्रकार संघ जावळीचे कार्याघ्यक्ष सादिक सय्यद यांना लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी जन्मशताब्दी पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल पत्रकार सादिक सय्यद यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.पुस्तकांचं गाव भिलर येथील लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी स्मारक समितीच्या बैठकीत हा पत्रकारितेतील पुरस्कार समितीने जाहीर केला. सादिक सय्यद सातारा जिल्ह्याचे दै प्रभात मध्ये पत्रकार म्हणून काम करीत असून या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडण्याचा व्यासंग सदैव जोपासला आहे . तर आपल्या लेखणीच्या द्वारे समाजातील विविध घटकांच्या समस्या त्यांनी मांडल्या असून त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याचा पाठपुरावा हा पत्रकारीतेतील मोठा गुण आहे .या कामाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीस समितीचे अध्यक्ष राजेंद्र राजपूरे, उपाध्यक्ष प्रवीण भिलारे, सचिव राजेंद्र भिलारे आबा , खजिनदार सुरेंद्र भिलारे ,प्रशांत भिलारे आदी उपस्थित होते.पत्रकार सादिक सय्यद यांच्या या निवडीबद्दल त्यांचे पत्रकारिता, सहकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.