कुडाळ ता. 24 – 54 गावाच्या पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटावा याकरता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून 1 टीएमसी धरणाला मान्यता मिळाली असून सदर धरणाचे सर्वे करण्यासाठी 80 लाख रुपये मंजूर असून सर्वेची टेंडर प्रक्रिया पूर्ण होवून वर्कऑर्डर झालेली आहे. मात्र विविध मागण्यासाठी सर्व्हे करण्यास बोंडारवाडी ग्रामस्थांचा विरोध होता यावर तोडगा काढण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शना खाली बोंडारवाडी येथे स्थानिक ग्रामस्थ ,जिल्हा बॅंकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब,जावळीचे प्रांत अधिकारी तहसीलदार साहेब जलसंपदा विभाग तसेच पुनर्वसन व महसूल विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली या मध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे शब्दावर विश्वास ठेवत ग्रामस्थांनी सर्व्हे करण्यास मान्यता दिली
यावेळी कमीत कमी जमीन बाधित होईल आणि 1tmc चे धरण होईल असा सर्व्हे करणेचे सूचना अधिकारी यांना केले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शेवट पर्यंत बोंडारवाडी ग्रामस्थ यांचे सोबत असून सर्व्हे झालेनंतर योग्य ती जागा ठरवून ग्रामस्थांचे नुकसान होणार नाही याची पुर्णपने काळजी घेतली जाईल प्रसंगी निधी वाढवून घेतला जाईल. असे ग्रामस्थ यांना अश्वासीत केले . तेव्हा ग्रामस्थानी सर्व्हे कराण्यास मान्यता दिली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व रांजणे साहेब यांनी ग्रामस्थांचे आभार मानले .