
कुडाळ प्रतिनिधी – मराठ्यांनो आरक्षण अंतिम टप्प्यात आल आहे ७० टक्के लढा आपण जिंकला आहे फक्त ३० टक्के लढा अजून बाकी आहे २४ डिसेंबरला आपल्याला आरक्षण मिळणारच मात्र काही लोकांना राजकीय फायद्यासाठी जातीय दंगली घडवायच्या आहेत म्हणून तुम्ही संयम राखा आणि मराठा समाजाची अशीच एकजूट ठेवा माझा जीव गेला तरी बेहत्तर मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय इंचभर ही मागे हटणार नाही असा निर्धार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त करून एक डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषण सुरू करावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले

मेढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या ऐतिहासिक सभेत जरांगे पाटील बोलत होते ते पुढे म्हणाले सत्तर वर्षात मराठा समाजाचा विश्वासघात केला गेला मराठा समाजाला आरक्षण हे होतच पण मराठा समाज गाफील राहिला अनेक नेमलेल्या समित्यांनी मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असे सांगितले गायकवाड आयोगाने मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध केलं तरीही मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही मंडल आयोगाने एकही जात मागास असल्याचे सिद्ध केलं नाही आणि तो अहवाल पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्यासमोर ठेवला आणि त्याला मंजुरीही मिळाली ओबीसींना ९४ ला आरक्षण दिलं गेलं आणि पुन्हा ९८ ला आरक्षण वाढवलं फक्त चार वर्षात त्यांची एवढी लोकसंख्या वाढली का ? असा प्रश्न उपस्थित करून जरांगे पाटील म्हणाले व्यवसायाच्या आधारावर आरक्षण देण्यात आली फक्त मराठ्यांनाच आरक्षण देताना वेगळ्या न्याय का लावला गेला आता टोकाच आंदोलन झालं त्यावेळी कुणबीच्या नोंदी सापडायला लागल्या राज्यातील असा कोणताही जिल्हा नाही की तिथं मराठा समाज आरक्षणात नाही आतापर्यंत या नोंदी सापडू नयेत म्हणून कोणी प्रयत्न केले त्याचं नाव आम्हाला कळलं पाहिजे

जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या बाबतीत षडयंत्र केलं गेलं सरकारवर दबाव टाकून या नोंदी दडवून ठेवल्या सत्तर वर्षे आमची कुटुंबे उध्वस्त केली आरक्षणात मराठा समाजाचा घात केला गेला आता मराठा समाज जागृत झालाय सर्वसामान्य मराठ्यांनी आता हा आरक्षणाचा लढा हातात घेतलाय ओबीसी नेत्यांचं नाव न घेता टीका करताना जरांगे पाटील म्हणाले ते विरोधात बोलले म्हणून मी सुरुवात केली कालच्या सभेत मला काय टोकरायची गरज होती का मी पण मराठीची अवलाद आहे त्यांचे वाभाडे काढलेच असते पण मराठा समाजाने मला संयम राखायला सांगितला आरक्षण जवळ आल आहे जरा सबुरीने घ्या असं सांगितलं म्हणून मी शांत आहे असं असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं

जरांगे पाटील यांच्या सभेसाठी संपूर्ण मेढा शहराचे वातावरण भगवेमय झाले होते सकाळी अकरा वाजल्यापासून मराठा समाज मोठ्या संख्येने एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत सभास्थळी दाखल होत होता भर उन्हात हजारोंच्या संख्येने मराठा समाज जरांगे यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर झाला होता या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती कुठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून सपोनि संतोष तासगावकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

जरांगे पाटील म्हणाले,,,,
जीवन जगताना पाणी जेवढं आवश्यक आहे तेवढेच आता जीवन जगताना आरक्षण महत्त्वाच आहे
आंदोलनात त्यांनी माझ्यावर खूप डाव टाकण्याचा प्रयत्न केला पण मी तो यशस्वी होऊ दिला नाही मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही
सत्तर वर्षात सगळे पक्ष मराठ्यांनीच मोठे केले कारण गरज पडली तर ते आमच्या उपयोगी पडतील अशी मराठा समाजाला आशा होती पण आज मराठा समाज आक्रोश करतोय पण एकही पक्ष एकही नेता मराठा समाजाच्या मदतीला येत नाही
मराठा समाजाच्या आंदोलनात मीडियाने मराठ्यांची बाजू खूप सांभाळली त्यांच्यामुळेच मराठ्यांच्या या आंदोलनाला आतापर्यंतचे यश मिळाले
छगन भुजबळ यांचे नाव न घेता आता कोणीही कितीही वळवळ केली तरी त्याचा फायदा नाही आपलं वय झालंय थोडं शांत बसलेले बरं कायदा पायदळी तुडवू नका पागल झाल्यासारखं बोलू नका अशी टीका केलीसाहेबांचं पोस्टर लावायचं थांबवा,,,,

आपल्या लेकराबाळांसाठी आरक्षण खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही नको त्यांना राजकारणात मोठे केलं.त्यातील एकही साहेब आपल्या आरक्षणाबाबत बोलत नाही. आता अशा साहेबांचे पोस्टर लावायचे काही दिवस थांबवा आपल्या लेकरांसाठी आरक्षण मिळेपर्यंत एकजूट ठेवा. राजकारण करा; पण मराठ्यांची एकजूट कायम ठेवा, असं कळकळीचे आवाहन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले
माझं उपोषण सोडवण्यासाठी मातब्बर नेत्यांनी प्रयत्न केले. त्यांना वाटले, याला सहज पटवू, पण मीसुद्धा तयारीचा आहे. त्यांचे तासभर ऐकून घ्यायचे आणि माझ्या विषयावर मी ठाम राहिलो. माझ्यावर अनेकांनी अनेक तिढे टाकून बघितले; पण आपल्या मराठा बांधवांच्या पाठिंब्यामुळे कुणाचे काही चालले नाही. आरक्षण मिळणारच आहे. सरकारला द्यावेच लागेल,असेही मनोज जरांगे पाटील यांनी सभेत सांगितले.

