जावळीजिह्वासामाजिक

“बौद्ध धम्म महोत्सव” जावलीत उत्सहात संपन्न – धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

   कुडाळ २५- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली धार्मिक व राजकीय मातृ संघटना भारतीय बौद्ध महासभा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने ६७ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त  जावली तालुक्यातील  विभागीय धम्म मेळावा पानस तर्फे करहर (संविधान नगर) येथे बुद्धविहारात बौद्ध भिक्कू भन्ते नागसेन यांचे उपस्थितीत बौद्ध धम्म महोत्सव जावली उत्स्फूर्तपणे संपन्न झाला .

बौद्ध धम्म महोत्सवाचे आयोजन भीमस्मरण तरुण मंडळ ,रमाई महिला मंडळ व बौद्धजन विकास मंडळ पानस  यांनी अतिशय उत्कृष्ट केले , बौद्ध भिक्कू भन्ते नागसेन  यांनी धम्म ध्वजरोहन करून उपस्थितीत बौद्ध धम्म बांधवांना धम्म दीक्षा दिली . तसेच बार्टीचे समन्वयक कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विशाल कांबळे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे व मेडिटेशन चे महत्त्व सांगितले , भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अनिल शिंदे यांनी प्रास्ताविक केले .
         रिपाईचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे व जावली तालुका सचिव दशरथ कांबळे या दोघांनीही आपल्या मनोगतात सांगितले की जावली तालुक्यात गावागावात जाऊन समविचारी आंबेडकरी संघटनांना सोबत घेऊन समाज हितासाठी समाज्याचे ऐक्य निर्माण करून धम्माचा  प्रचार व प्रसार करणार असून जावली तालुक्यात धार्मिक, सामाजिक व राजकिय आंबेडकरी चळवळ आजून अतिशय गतिमान करणार असून इथून पुढे विभागीय धम्म मेळावे घेऊन  सामाजिक समतेचा रथ आंबेडकरी चळवळीच्या मादयमातून पुढे नेणार व तालुक्यात पुन्हा जोरदार पँथर आंबेडकरी चळवळ उभी करणार  .

१४ ऑक्टोबर १९५६ (विजयादशमी ) भारतीय इतिहासातील सुवर्ण दिवस , तमाम बौद्ध अनुयायांच्या आयुष्याला कलाटणी देणारा दिवस , अस्पृश्यांना ,वंचीतांना जनावरांपेक्षाही हीन व नीच वागणुक मिळणाऱ्या सामाजिक व्यवस्थ्येतून बाहेर काढून माणसाला खऱ्या अर्थाने  माणसाप्रमाणे जगायला शिकवणारा दिवस आजच्या दिवशी सत्य , अहिंसा , आष्टांगमार्ग , पंचशीलाद्वारे मानवतावाद रुजविणारा संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान बुद्धांचा बौद्ध धम्म स्वीकारण्याचा क्रांतिकारी निर्णय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला.
       ५ लाख अनुयायांसह नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध , सम्राट अशोका नंतरची जगातील तिसरी धम्मक्रांति डॉ.बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दीक्षा घेऊन केली होती .

मान्यवरांचे स्वागत व आभार पोलीस पाटील प्रशांत सकपाळ  रिपाई करहर विभाग अध्यक्ष विशाल सकपाळ , सरपंच मारुती सकपाळ ,ग्रामपंचायत सदस्य पोपट सकपाळ ,शांताबाई सकपाळ ,छाया सकपाळ यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button