कुडाळ २५ – प्रतिनिधी -जावली तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक लागलेल्या २४ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर ६ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्षात निवडणूक लागली आहे.
निवडणूक अर्ज भरल्यानंतर बुधवारी निवडणुकीचे अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी अनेक इच्छुकांनी निवडणुकीतून आपले अर्ज माघारी घेत गावात निवडणूक न लावता ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. यात २४ पैकी दुंद,गांजे, गोंदेमाळ, आगलावेवाडी, कुंभारगणी, नांदगणे, वाळंजवाडी, तळोशी, एकीव, कावडी, पानस, तेटली, केळघर तर्फ सोळशी, कोळघर, ओखवडी, आसनी, भोगवली तर्फ मेढा, गाढवली( पु.) या १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.तर आनेवाडी, कुरळोशी, वागदरे, भामघर, बिभवी व सांगवी तर्फ मेढा या केवळ सहा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली आहे.