कुडाळ ता.24 – अग्रभागी मानाचा भगवा ध्वज…. हलगी, तुतारी व ढोल पथक…त्यामागे मानाचे शस्त्र पथक… आणि त्यामागे भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक व युवती कुडाळ ता.जावळी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौड मध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाले. नवरात्रीनिमित्त घटस्थापनेपासून गावातून विविध भागांतून दररोज निघालेल्या श्री दुर्गामाता दौंडीचा समारोप मंगळवारी विजयादशमीनिमित्त झाला.
प्रारंभी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराज व जय जय श्रीराम यांच्या जयघोषाने संपूर्ण कुडाळ नगरी दुमदुमून गेली होती प्रारंभी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन झाले,यानंतर कुडाळच्या ग्रामदेवत श्री पिंपळेश्वर वाकळेश्वर महाराजांच्या ग्रामदैवत मंदिरापासून श्री दुर्गामाता दौडीस प्रारंभ झाला.
भारत हिंदुस्थान है हिंदूओं की शान है, जय भवानी जय शिवराय आदी गीते, श्लोक म्हणत श्री दुर्गामाता दौड आज मोठ्या उत्साहात निघाली. वाटेत हिंदू बांधवांनी श्री दुर्गामाता दौडीचे रांगोळीच्या पायघड्या घालून, फटाक्याच्या आतिषबाजीने व पुष्पवृष्टी करत स्वागत केले. हजारो युवक युवती एकाच वेळी रस्त्यावर चालत असूनही यावेळी असलेल्या शिस्तीचे नागरिकांनी कौतुक केले.श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिरापासून कुडाळ बाजारपेठेतून श्री दुर्गामाता दौड श्री तुळजाभवानी मंदिरात पोहोचली. या ठिकाणी आरती आणि ध्येयमंत्राने श्री दुर्गामाता दौडीचा कुडाळ मध्ये समारोप झाला.