जावळीजिह्वासहकार

“प्रतापगड” चा बॉयलर प्रदिपण सोहळा जावलीतील शेतकऱ्यांसाठी “सुवर्ण क्षण” : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सोनगाव येथे अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाकडून गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न

कुडाळ ता.16 – माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या संकल्पनेतून व स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून उभा राहिलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना अनंत अडचणीवर मात करून आज पुन्हा नव्या उमेदीने सुरू होत आहे हा जावली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णक्षण आहे असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने भागीदारी तत्वावर चालविण्यास घेतलेल्या सोनगाव त जावळी येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठीचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार शिवेंद्रसिंहराजें भोसले बोलत होते.


यावेळी कार्यक्रमाला सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंमरे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा व संचालिका श्रीमती सुनेत्रा शिंदे, प्रतापगड चे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे, अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, प्रतापगडचे कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे, अजिंक्यतारा व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, जावली बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, पतसंस्थेच्या अध्यक्षा, अंकिता शिंदे, माजी सभापती अरुणा शिर्के,उपसभापती हणमंतराव पार्टे, यांच्यासह मान्यवर. व सर्व संचालक उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले,प्रतापगड कारखाना जावली तालुक्यातील जनतेच्या आपल्या हक्काचा आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून जावली तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून लालसिंगराव शिंदे यांनी हा कारखाना उभा केला. हा कारखाना सर्वसामान्य जनतेच्या मालकीचा आहे. आम्ही केवळ आर्थिक दृष्टीने अडचणीत असणाऱ्या कारखान्याला सहकार्य करण्यासाठी आलो आहोत. कारखाना पुन्हा एकदा चांगला उभा राहिला की तो प्रतापगड चे संचालक मंडळ स्वबळावर चलवेलच असा ठाम विश्वास आहे.परंतु सध्या तो अडचणीतून बाहेर काढणे महत्वाचे आहे,


प्रतापगड कारखाना सुरळीत चालावा यासाठी कोणतेही राजकारण न करता सर्वांचा ऊस तोडला जाईल. या गळीत हंगामात अजिंक्य तारा प्रतापगड साखर उद्योगाने चार लाख मे. टन ऊस गळापाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास प्रतापगड कारखाना लवकर आर्थिक सक्षम होईल. प्रतापगड लवकर कर्ज मुक्त होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील. ऊस दराच्या बाबतीत इतर कारखान्या तुलेनेत आपला कारखाना कुठेही मागे राहणार नाही अशी ग्वाहीही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांची या वर्षीची दिवाळी गोड करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल.. आपल्या गावातील ऊस अन्य कारखान्याला जाणार नाही या साठी संचालक व कर्मचारी यांनी दक्ष रहावे.महू हातगेघर व बोन्डरवाडीचे पाणी लवकरात लवकर शेतात यावे यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
वसंतराव मानकुमरे म्हणाले, प्रतापगड साखर कारखान्याला आमदार पाहिजे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी चालवायला घेऊन खऱ्या अर्थाने जवलीतील जनतेचे व शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे, तालुक्यातून जास्तीत जास्त ऊस गाळापास आमला जाईल.


प्रतापगड चे अध्यक्ष सौरभ शिंदे म्हणाले, प्रतापगड कारखान्याच्या उभारणीपासून नैसर्गिक,आर्थिक, कौटुंबिक अनेक संकटे आली. परंतु त्यावर मात करून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या सहकार्यामुळे आजचा सुवर्ण दिवस उजाडला आहे,या पुढील काळात प्रतापगड कारखाना जोमाने चालण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.कारखाना येणार हंगाम यशस्वीपणे पूर्ण करेल व गळपाचे उदिष्ठ गाठेल.
प्रारंभी प्रतापगड कारखान्याचे उपाध्यक्ष ऍड.शिवाजीराव मर्ढेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी छायाताई मर्ढेकर यांच्या हस्ते बॉयलर चे विधिवत पूजन व धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले, सौरभ शिंदे, व मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.
प्रतापगड चे उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. संतोष गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. अजिंक्यतारा चे उपाध्यक्ष नामदेव सावंत यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button