मेढा, दि १५ : ( विजय सपकाळ- प्रतिनिधी) जावळी तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी दुर्गा देवी मातेचे जल्लोषात वाजत गाजत स्वागत करून विधिवत पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना केली . आज निघालेल्या बहुतांश मिरवणुकीमध्ये मंगलमय वातावरणात सनई चौघड्याच्या निनादात व हरिनामाच्या गजरात दुर्गा मातेच्या जयघोषात देवीची आगमन तालुक्यातील ठीक ठिकाणी करण्यात आले . तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा या ठिकाणी यामुळे रस्त्यावरती चांगलीच वर्दळ दिसत होती . तर भाविक भक्तांची खरेदीसाठी लगबग दिसत होती
करंजे तर्फ मेढा येथील नवरात्र उत्सव दुर्गा मंडळ यांच्या वतीने दुर्गा मातेची काढलेली मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधत होती .हरिनामाच्या गजरात टाळ मुदृंगाच्या साथीत पांडुरंगाच्या नामस्मरणात ही मिरवणूक वाजत गाजत मेढ्यापासून करंजेपर्यंत पायी आली . त्यानंतर देवीची स्थापना विधिवत पद्धतीने करण्यात आली . तसेच जावळी तालुक्यामध्ये गावोगावी ग्रामदेवतेच्या मंदिरात मोठ्या भक्ती भावाने घटस्थापना करण्यात आली . त्या ठिकाणी भक्तगणांची सुरुवात झाली . आपल्या ग्रामदेवतेची विधी व पूजा आरती करण्यात आली . सर्वत्र सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
मेढा : येथून करंजे येथील वारकरी दिंडीच्या साथीने निघालेली दुर्गा मातेची मिरवणुक ( छाया : विजय सपकाळ )