कुडाळ ता. 4 – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातील देशातील अव्वल बँक म्हणून आोळखली जाते, शेतकरी, कष्टकरी यांची आर्थिक वाहीणी असलेल्या जिल्हा बँकेला आजपर्यंत नाबार्ड चे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत, बँकेचे संचालक मंडळ व कर्मचारी शेतकरी सभासदांच्या हितासाठी कायम तत्पर असून, बॅंकेचे विविध कर्ज योजनांचा व व्याज परतावा आणि अनुदानित योजनांचा लाभ जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे मत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री. ज्ञानदेव रांजणे यांनी बोलताना व्यक्त केले.
करंदी तर्फे कुडाळ शाखेअंतर्गत मे. विधी टुर्स अॅणड ट्रॅव्हलर्स या वाहन व्यवसायाकरिता कर्जदार श्री.प्रताप हणमंतराव पवार यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र सादर करुन कर्जावरील व्याज परतावा मिळणे करिता कर्ज प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.
सदर कर्ज योजनेतून खरेदी केलेल्या वाहनाची चावीचे वितरण बॅंकेचे सन्माननीय संचालक ,श्री. ज्ञानदेव रांजणे साहेब यांचे हस्ते कर्जदार श्री. प्रताप पवार, रा- मार्ली भालेघर यांना विभागीय कार्यालय मेढा येथे संपन्न झाला
यावेळी श्री. अण्णासाहेब फरांदे विभागीय विकास अधिकारी, श्री. नारायण जाधव शाखा विकास अधिकारी, श्री. गणेश बारटक्के शाखाप्रमुख शाखा – करंदी तर्फे कुडाळ, श्री. अरुण खटावकर, श्री. धनंजय महामुलकर, श्री. रामभाऊ शेलार, चेअरमन, केळघर विकास सोसायटी, श्री. मोहन कासुर्डे, चेअरमन, वरोशी विकास सोसायटी, श्री. सागर धनावडे,श्री. निखिल भोसले आदी उपस्थित होते. शाखाप्रमुख गणेश बारटक्के यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.