कुडाळ ता. 2 – जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यामातून संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, संस्थेची निवडणुक बिनविरोध होण्यासाठी तालुक्यातील सर्व गट तट एकत्र आले मात्र दरवेळी कोणतीही निवडणूक लागली की काहींना निवडणूक लादण्याची हौस येते,मात्र प्रत्येक निवडणुकीत मतदार त्यांना मताच्या रूपात त्यांची जागा दाखवून देतात, त्यामूळे अशा विरोधकांचा विषय आता तालुक्यातून संपल्यात जमा असल्याचे मत सातारा जावळी चे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले,
जावली महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक साधारण सभा कुडाळ ता. जावळी येथेसंपन्न् झाली त्यावेळी आमदार भोसले बोलत होते पुढे ते म्हणाले, महू हातगेघरच धरणाचे काम पुर्ण होऊन लवकरात लवकर शिवारात पाणी यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, जसे बोंडारवाडी चे काम मार्गी लावले तसेच महू हातगेघरचे काम ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने लवकरच मार्गी लागेल, तसेच बाजार समितीच्या नविन संचालक मंडळाची वाटचाल योग्य दिशेने सूरू असून यासाठी शभासद शेतकर्यांनी त्यांना सहकार्य करावे, बाजार समितीच्या वतीने नविन इमारत, व्यापारी गाळे, पेट्रेल पंप, आदी नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत,तेही लवकरच पूर्णत्वास जातील, येणारा हंगामात प्रतापगड कारखाना जोमाने सुरु होनार असून सर्व शेतकर्यांनी जास्तीत जास्त उस तालुक्यातील आपल्या हक्काच्या कारखान्यालाच द्यावा, यामध्ये कोणताही राजकीय गट तट न ठेवता सर्वांचा ऊस कारखाना नेणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला,
यावेळी माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे प्रतापगड चे अध्यक्ष सौरभ शिंदे, माजी शिक्षण सभापती अमित कदम, राजेंद्र राजपुरे, ज्ञानदेव रांजणे, सभापती जयदीप शिंदे,उपसभापती हेमंत शिंदे, यांच्यासह सर्व संचालक,विवीध क्षेत्रातील पदाधिकारी,शेतकरी उपस्थित होते, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे यांनी या सभेमध्ये बाजार समितीने उत्पन्न वाढ व विकासाच्या दृष्टीने केलेली उपाययोजनांची माहिती देवून समितीचया आगामी ध्येय धोरणे बाबत विस्तृत माहिती दिली, कार्यक्रमाच्या सुरवातीला सचिव महेश देशमुख यांनी अहवाल वाचन करून संस्थेची माहिती दिली तर उपसभापती हेमंत शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. संचालक मचींद्र मुळीक यांनी सूत्रसंचालन केले.