जावळीजिह्वासामाजिक

जावळी पंचायत समितीकडून स्वच्छता अभियान – गांधी जयंतीचे औचित्य साधून “स्वच्छता ही सेवा” उपक्रम


मेढा प्रतिनिधी :- जावली पंचायत समिती तर्फे स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत कचरा मुक्त भारत अभियान 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 महात्मा गांधी जयंती औचित्य साधून स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. पंचायत समिती जावली येथे स्वच्छता ही सेवा या दिवशी स्वच्छता रन या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. जावळी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी मनोज भोसले साहेब, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान मोहिते उपस्थितीत होते.


स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता रन या उपक्रमांतर्गत स्वच्छतेचे बॅनर्स होर्डिंग्स हाती घेऊन उपक्रमाविषयक प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. तसेच स्वच्छता रन च्या दरम्यान स्वच्छता विषयक घोषणा देण्यात आल्या. व उपक्रमा विषयक माहिती देताना व उपक्रमांतर्ग गावांमध्ये स्वच्छता, इत्यादी प्लास्टिक कचरा संकलना बाबत स्वच्छता मोहीम राबवणे, एकेरी वापराच्या प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती केली.या प्रसंगी पंचायत समिती कार्यालयाकडील सहाय्यक प्रशासन अधिकारी कैलास गायकवाड साहेब, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनिल उबाळे साहेब व संजय नारकर साहेब,वरिष्ठ सहाय्यक श्रीकांत रासकर ,श्रीमती सविता खताळ मॅडम ,विस्तार अधिकारी पंचायत वसंतराव धनावडे साहेब,अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती सपकाळ, श्रीमती पवार ,कृषी विस्तार अधिकारी प्रशांत शिंदे साहेब, श्रीमती हेमलता येवले,राऊत , तसेच आरोग्य विभाग, सांख्यिकी विभाग,सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी घरकुल,नरेगा,आपले सरकार सेवा केंद्र, व बि आर सी चे रमेश शिंदे , संतोष जाधव,पाणी गुणवत्ताचे श्रीमती रुचा परामणे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button