जावळीजिह्वासामाजिक

गांधी जयंती निमित्त जावळीतील सावलीत स्वच्छतेचा जागर- ग्रामस्थांनी केले एकजूटीने श्रमदान

मेढा, दि . १ : महात्मा गांधी जयंती पंधरावड्या निमित्त स्वच्छता हिच सेवा अभियान अंतर्गत कचरा मुक्त भारत आणि कचरा मुक्त गाव करण्यासाठी स्वच्छतेसाठी श्रमदान आज आदर्श ग्रामपंचायत सावली येथे सरपंच विजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ, जिल्हा परीषद प्राथमिक शाळा व क्रांती विद्यालय सावली, अंगणवाडी यांच्यावतीने करण्यात आले . यामध्ये साधारण १५० ते २०० प्लॅस्टीकचा कचरा तीन पोती जमा करण्यात आला . तर रस्ते , नाले, तसेच शाळा परीसर स्वच्छ व साफ सफाई करण्यात आली .


सावली गावांमध्ये दर महिन्याच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी श्रमदान होतच असतं . मात्र यावेळी महात्मा गांधी पंधरावडयानिमित्त गावांमध्ये विविध स्वच्छतेचे उप्क्रम सुरु केले आहेत . यामध्ये गावामध्ये झालेल्या ग्रामसभेमध्ये प्लॅस्टीक बंदीचा वापर केला असून कचरा मुक्त गांव करण्याचा निर्धार झाला आहे . तसेच घरातील प्लॅस्टीक घरातच साठवणे ओले व सुके प्लॅस्टीक वेगवेगळे करून ते एकत्रित करणे त्यासाठी ते प्लॅस्टीक सकुलनात जमा करणे असे सुरु करण्यात आले आहे .


प्रारंभी शाळेच्या प्रारंगणात ग्रामस्थ, शिक्षक व विद्याथी यांना स्वच्छताही सेवा ही शपथ देण्यात आली .
यानंतर गावच्या प्रारंभी कमानीपासून ते गावातील पाण्याच्या टाकीपर्यंत किमान एक किलोमीटर परीसरातील रस्ता, नाले, शाळा परीसरातील कचरा व प्लॅस्टीक उचलू न जमा करून स्वच्छेच्या विषयी जागर करण्यात आला . यावेळी गावातील स्वच्छतेच्या नियोजनाबाबत सरपंच विजय सपकाळ यांनी सुचना करून नियोजन सांगीतले . तर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ दळवी यांनी सर्वांना स्वच्छतेचे धडे दिले . या नंतर स्वच्छतेला प्रारंभ झाला . सकाळी नऊ ते ११ वाजेपर्यंत दोन तास पावसाच्या उघझापेतही शेकडो हातांनी यामध्ये चिमुकल्या हातानांही स्वच्छता केली . स्वच्छ गांव सुंदर गांव अशा घोषनाही दिल्या . तसेच शाहूनगरमध्येही स्वच्छता करण्यात आली .

या अभियानामध्ये सरपंच विजय सपकाळ,,अजिंक्य नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर, ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदा जुनघरे, प्रकाश जुनघरे, पोलिस पाटील संजय कांबळे, सुरेश कांबळे, क्रांती विद्यालयाचे मुख्याध्यापक एस आर पवार,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ दळवी, माजी सरपंच दुर्योधन जुनघरे,ग्रामसेवक दिपक राक्षे,शिक्षक कासम पठाण, प्रतापराव धनावडे, अकुंश सपकाळ, तानाजीराव केमदारणे, तुकाराम पाटणे, जगन्नाथ जुनघरे,रमेश म्हस्कर, ज्ञानदेव जुनघरे,अंगणवाडी सेविका अमृता म्हस्कर, सुषमा जुनघरे, वंदना जुनघरे शिपाई रविंद्र जुनघरे, हणमंत जुनघरे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठया उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button