जावळीजिह्वाराजकीय

आमदार शिवेंद्रराजेंच्या प्रयत्नाने बोडांरवाडी धरणाला मान्यता : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा महत्वपुर्ण निर्णय

कुडाळ ता. 1 – : जावली तालुक्यातील सिंचनाच्या दृष्टीने महत्वपुर्ण असणारया व गेल्या अनेक वर्षाहुन प्रलंबित असणार्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार असून राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कडुन या धरणाला मान्यता मिळाली आहे. सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यानिमित्ताने आज खऱ्या अर्थाने यश आले असून शिंदे फडणवीस सरकार कडुन बोडांरवाडी धरणाला १ टी एम सी पाणीसाठा करिता मान्यता देत शासन निर्णयाला आज मान्यता मिळाली आहे..

सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबत विषेश प्रयत्न करत. शिंदे फडणवीस सरकार कडुन याबाबत प्रश्न मार्गी लावला आहे. महाराष्ट्र शासनाकडुन पारीत केलेल्या शासन निर्णया प्रमाणे कृष्णा प्रकल्प हा कृष्णा नदीवर असून त्यास सन १९६७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. कृष्णा प्रकल्पाच्या पाणीवापरात होणाऱ्या बदलामुळे पुनर्विलोकन करून कृष्णा प्रकल्पाचे पाणी वापराचे फेरनियोजनास शासनाची मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांचे संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये प्राप्त झाला आहे. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंधसह १६ गावांना सिंचनासाठी कृष्णा प्रकल्पातील कण्हेर जलाशयातून पाणी आरक्षित होणेसाठी कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनास शासन निर्णय दि.०७.०९.२०२२ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.. तदनंतर बोंडारवाडी प्रकल्पासह कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनास मान्यता मिळणेसाठी प्राप्त प्रस्तावानुसार सुधारित जलनियोजन अंतिम करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय- कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांनी संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये सादर केलेल्या फेरजलनियोजनाच्या अनुषंगाने यापूर्वी निर्गमित शासन निर्णय क्र. बिसिआ २०२१ / ( २५३ / २०२१)/ सिं.व्य. (धो-२), दि.०७.०१.२०२२ अधिक्रमित करून खालील अटींच्या अधीन राहून कृष्णा प्रकल्प, जि. सातारा या प्रकल्पाच्या सुधारीत फेरजलनियोजनास परिशिष्ट अ नुसार मान्यता देण्यात येत आहे.

१. महामंडळाने सादर केलेल्या कृष्णा प्रकल्पाच्या सुधारीत फेर जलनियोजनाची संपुर्ण जबाबदारी कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता यांची राहील. २. सदर नियोजनानुसार एकात्मिक राज्य जल आराखड्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. ३. प्रस्तावित फेर नियोजनामुळे कृष्णा खोरे पाणी तंटा लवादामधील तरतुदींचा भंग होणार नाही याची खातरजमा महामंडळाने करावी. ४. सदर जलनियोजनामध्ये बदल होणार नाही याची दक्षता महामंडळाने घ्यावी असेही आदेशात म्हंटले आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभेच्या पायरीवर बोडांरवाडी धरणाबाबत आदोंलन छेडले होते. तसेच बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक ,जलनायक कै. विजयराव मोकाशी यांनीही या धरणासाठी शेवटपर्यंत लढा दिला होता. एकुणच सर्वांच्या प्रयत्नाला आज यश आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button