कुडाळ ता. 1 – कृषी उत्पन्न बाजार समिती जावली- महाबळेश्वर या बाजार समितीची वार्षिक साधारण सभा बाजार समितीचे सभापती मा. जयदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी अक्षता मंगल कार्यालय कुडाळ येथे दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी आयोजित केली आहे.
या सभेमध्ये बाजार समितीने उत्पन्न वाढ व विकासाच्या दृष्टीने केलेली उपाययोजनांची माहिती देवून व समितीची ध्येय धोरणे याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. सदर सभेत मार्गदर्शन करण्यासाठी सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधान परिषद सदस्य आमदार शशिकांत शिंदे व वाई – महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद आबा पाटील तसेच वसंतराव मानकुमरे, राजेंद्र राजपुरे, ज्ञानदेव रांजणे, प्रतापगडचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे, अमित दादा कदम, आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती समीतीचे सभापती जयदीप शिंदे यांनी दिली आहे तरी या सभेस जावली व महाबळेश्वर तालुक्यातील विकास सेवा संस्थांचे पदाधिकारी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आव्हान समितीचे उपसभापती हेमंत शिंदे यांनी केले आहे.