जावळीजिह्वासामाजिक

श्रध्देचे प्रतिक असलेल्या “मानाच्या महागणपती”चे मान्यवरांकडून दर्शन : प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते ‘नटराज मंडळाच्या महागणपती’ ची आरती

महेश बारटक्के – प्रतिनिधी
कुडाळ ता. 27 – जावळी तालुक्यातील 47 वर्षांची परंपरा असलेल्या कुडाळ येथील पहिला मानाचा महागणपती अशी ख्याती अससेल्या नटराज युवक मंडळाच्या मानाच्या गणपतीची आरती तालुक्यासह जिल्हय़ातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली,

जावळी तालुक्यातील सर्वात जूने व श्रध्देचे प्रतिक असलेल्या नटराज मंडळाची स्थापना 1978 साली करण्यात आली आहे, बाजारपेठेतील व्यापारी मंडळ म्हणून देखील या मंडळाचा नावलौकीक आहे, सामाजिक, सांस्कृतिक वारसा जोपासणाऱ्या नटराज मंडळाने आजपर्यंत अनेक सामाजिक व विधायक उपक्रम राबविले आहेत, नटराज मंडळाचा मानाचा महागणपती म्हणजे भाविकांचे अढळ श्रध्दास्थान मानले जाते, जे भक्तगण आपले मागणे या गणरायाकडे मागतात त्यांचे मागणे, इच्छा गणपती बाप्पा पुर्ण करतो, त्यामुळे नवसाला पावणारा गणपती अशीही आोळख या गणपतीची आहे, त्यामुळे हजारो भक्तगण या गणरायाच्या चरणी लीन होऊन त्याचे आशिर्वाद घेत असतात,

गणेशोत्सवामुळे गेल्या दहा दिवसांपासून विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी नटराज मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले, तसेच मंडळाच्या वतीने देखील सर्व मान्यवरांचे मोठ्या दिमाखात स्वागत केले. मंडळांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकसेवेचा वसा जपला आहे. यावेळी समाज हिताचे काम करणाऱ्या गणेश मंडळांनी केलेल्या सामाजिक कार्याचे आपण ऋण फेडणे गरजेचे आहे, याच भावनेने नटराज मंडळाला भेट देऊन श्रींचे दर्शऩ गेतले असे मत मेढ्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष तासगांवकर यांनी बोलताना व्यक्त केले.

यावेळी प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे, मेढ्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष तासगांवकर, भुमि अभिलेख अधिक्षक श्री. सचिन वाघ महाबळेश्वर व भुमि अभिलेख अधिक्षक श्री.गोरखनाथ जाधव आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती संपन्न झाली,
यावेळी ‘नटराज’चे सर्व पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते. आरती केल्यानंतर ‘मानाचा महागणपती’च्या वतीने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. आजचा बुधवार हा गणेशोत्सवाचा 9 वा दिवस असल्याने भाविकांनी बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. रात्री आठ वाजता मान्यवर बाप्पांचे दर्शनघेण्यासाठी दाखल झाले. त्यांच्यासमवेत अनेक मान्यवर, पोलिस कर्मचारी, भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button