कुडाळ ता. 5 – कर्तव्य सोशल ग्रुप सातारा व सौरभ बाबा शिंदे मित्र समुह जावळी यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ ता. जावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भारतातील सुप्रसिध्द संचेती हॉस्पीटल, पुणे यांच्या सहकार्याने तज्ञ डॉक्टरांव्दारा मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती आयोजक व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सैारभबाबा शिंदे यांनी दीली आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे जावली तालुक्याचे विद्यमान आमदार असून त्यांच्या माध्यमातून तालुक्यात कोट्यावधी रूपयांची विकासकामे सूरू आहेत, विकासकामांबरोबरच तालुक्यातील जनतेच्या हितासाठी त्यांच्या मार्गदर्शनानुसार विविध सामाजिक उपक्रम देखील सूरू असतात, त्याचाच भाग म्हणून सामाजिक भान ठेऊन जावळी सारख्या ग्रामिण भागातील रुग्णांची सेवा करणे एक मोठी जबाबदारी आहे आणि म्हणूनच या तपासणी शिबिराचे आयोजन करून जनतेची यामाध्यमातून एक प्रकारे खूप मोठी सेवा घडेल या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, यावेळी माहीती देताना सैारभबाबा शिंदे यांनी सांगितले की, आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून हे आरोग्य शिबीर घेतले आहे, या आरोग्य शिबिरांने तालुक्यातील गरजू रूग्णांना नक्कीच मोठा फायदा होईल, या शिबिराचे आयोजन गुरुवार ७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत कुडाळ ता. जावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आले असून कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा श्रीमंत. छ. सौ. वेदांतीकाराजे भोसले व प्रतापगड साखर कारखान्याचे अध्यक्ष सौरभ (बाबा) शिंदे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन होणार आहे,
या शिबिरात हाडांची तपासणी व सल्ला, अत्याधुनिक मशिनव्दारे हाडांची ठिसुळता तपासणी, फिजिओथेरपी, सांधेदुखी, संधीवात, सांधे प्रत्यारोपण कंबर दुखणे, हाता-पायांना मुंग्या येण, फ्रोजन शोल्डर, मणक्याचे जुने आजार, डायबेटीक न्युरोपॅथी, सायटीका पेन, लिगामेंट इंज्युरी, टेनिस एल्बो, हिप व नी रिप्लेसमेंट नंतरचे उपचार या सर्व आजारांवर मोफत मार्गदर्शन व उपचार करण्यात येणार आहे.तसेच सदरचे शिबीर मोफत आहे पण त्यासाठी नोंदणी अनिवार्य असून शिबीराला येताना जुनी केसपेपर्स व एक्सरे घेऊन यावे तसेच या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन अधिक माहीतीसाठी 9922814112, 8888748165, 7588342915 या मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.