कै बापुराव पार्टे (आप्पा) हे जावली तालुक्यातील एक सुसंस्कत, तत्व,निष्ठा,मूल्ये जपणारे आदर्शवत राजकारणी होते त्यांची समाजासाठी व जनतेसाठी मोठी तळमळ होती, राजकारणात राहूनही त्यांनी समाजकारणाला महत्त्व दिले, जावली तालुक्याच्या विकासात आप्पांचा मोठा वाटा आहे त्यांच्या जाण्याने तालु्क्यात राजकीय पोकळी निर्माण झाली असून आप्पांच्या राहिलेल्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
जावली तालुक्याचे माजी उपसभापती बापूराव पार्टे (आप्पा) यांचे नुकतेच निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या शोकसभेत आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते यावेळी आ शशिकांत शिंदे,माजी आ सदाशिव सपकाळ,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,मंत्रालयातील सचिव आर के धनावडे, प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभबाबा शिंदे, उपाध्यक्ष एँड. शिवाजीराव मर्ढेकर, संचालक आनंदराव जुनघरे,माजी उपसभापती तानाजी शिर्के,रवींद्र परामणे,किसनवीरचे संचालक हिंदुराव तरडे,संदीप परामणे, नितीन गावडे,समाधान पोफळे ,धनंजय केंजळे, बुवासाहेब पिसाळ, तुकाराम घाडगे, उद्योजक विजय शेलार ,नगरसेवक शशिकांत गुरव व पार्टे कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते.
आ शशिकांत शिंदे म्हणाले, तालुक्यातील डोंगर कपारीतील माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आप्पांनी आपल्या पदांचा वापर केला आप्पांच्या सहकार्यामुळेच मी या तालुक्याचा आमदार झालो ,एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून आप्पांचा जिल्ह्याचा राजकारणात दबदबा होता आप्पा कर्तुत्वाने खूप मोठे आणि महान होते माझी राजकीय प्रेरणा आप्पा होते त्यांच्या जाण्याने जावलीची जनता एका जाणत्या नेत्याला आणि कुशल राजकीय मार्गदर्शकाला मुकली आहे आप्पांचे व्यक्तिमत्व मनाला भावणार होतं त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक वादळ आली परंतु आप्पांनी आपली तत्त्व,निष्ठा याच्याशी कधीही तडजोड केली नाही म्हणून आप्पा श्रेष्ठ होते. माजी आमदार सदाशिव सपकाळ म्हणाले, मी आमदार असताना महू हातगेघर धरणासाठी आप्पांची तळमळ खूप मोठी होती या धरणाचे पाणी माझ्या भागातील शेतीला मिळावे शेतकरी सुखी व्हावा यासाठी आप्पांनी खूप कष्ट घेतले, मीही कोणताही राजकीय विधीनिवेश न धरता उपसभापती असलेल्या आप्पांना सहकार्य केले,
वसंतराव मानकुमरे म्हणाले, आपला प्रपंच करता करता आप्पांनी समाजही आपला प्रपंच समजून काम केले महू हातगेघर धरणाचे पाणी शेतीला मिळण्यासाठी प्रयत्न करणे हीच आप्पांना खरी श्रद्धांजली ठरेल, यावेळी रवींद्र परामणे, तानाजी शिर्के, संदीप परामणे, अँड. शिवाजीराव मर्ढेकर, आर. के. धनावडे, शशिकांत गुरव यांनी आप्पांना श्रद्धांजली वाहिली. पार्टे कुटुंबियंच्या वतीने बोलताना माजी उपसभापती हणमंतराव पार्टे म्हणाले, आमचे सर्वांचे आधारवड व ज्येष्ठ व्यक्तीमत्व स्वर्गीय. बापुराव कोंडिबा पार्टे (जाधव) उर्फ आप्पा यांचे नुकतेच दुखद निधन झाले. आमच्या कुटूंबावरती दुखा:चा डोंगर कोसळला या दुखद समयी आम्हाला धीर देण्यास आप्तेष्ट, मित्रपरिवार, सामाजीक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक तसेच विविध संस्था, मंडळ, जेष्ट नेते, कार्यकर्ते यांच्यासह व्यवसायिक हितचिंतक यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दूरध्वनीव्दारे व समक्ष भेट देऊन सांत्वन केले, त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत.