मेढा /प्रतिनिधी
सुपोषित भारत, साक्षर , सक्षम भारत घडविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. मुले अशक्त असतील तर कुटूंबही अशक्त होते .आहार व आरोग्याची योग्य काळजी घेतली तर आपले शरीर व आरोग्य उत्तम राहाते . पोषण सप्ताहामध्ये पोषणाची चळवळ हा कार्यक्रम संपूर्ण देशात राबविला जात असून त्यासही समाजातील सर्व घटकांचे सहकार्याची गरज आहे. असे प्रतिपादन एकात्मिक बाल विकास नागरी प्रकल्प सातारा पश्चिमचे प्रकल्पाधिकारी दिपक ढेपे यांनी केले.
एकात्मिक बालविकास नागरी प्रकल्प सातारा पश्चिम च्या मेढा बिट मधील अंगणवाडयांच्या वतीने राष्ट्रीय पोषण अभियानाचे औचित्य साधून म. गांधी वाचनालयाचे सभागृहात आयोजीत केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी दिपक ढेपे बोलत होते.
प्रकल्पाधिकारी दिपक ढेपे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केलेल्या कार्यक्रमास डॉ. मधुरा देशमुख , वेण्णामाई पतसंस्थेचे अध्यक्ष , पत्रकार सुरेश पार्टे , पर्यवेक्षिका हेमलता मोरे, विद्या आगवणे, मनिषा गुरव , अंगणवाडी सेविका , मदतनिस , व मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी डॉ. मधुरा देशमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये पोषण आहारात विविधतेचे महत्व , आहार, व्यायाम व विश्रांती ही त्रिसुत्री व सही पोषण , देश रोशन यावर मार्गदर्शन केले. व यावेळी महिला पालकांनी तयार करून आनलेल्या पोष्टीक पाककृतीच्या पदार्थांचे उपस्थित मान्यवरांचे वतीने परीक्षण करण्यात आले. त्यातून गुणानुक्रमे क्रमांक काढून त्यांचा व सेविका , मदतनिस यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
प्रारंभी प्रकल्पाधिकारी दिपक ढेपे व मान्यवरांचे हस्ते फित कापून राष्ट्रीय पोषण आहार अभियानाचे व पोष्टीक आहार स्पर्धचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका , मदतनिस, यांनी प्रकल्पातील सर्व समावेशक विषयांना धरून पपेट शोचे सादरीकरण केले . त्याचे सर्वांनी कौतुक केले.पर्यवेक्षिका हेमलता मोरे यांनी प्रास्ताविकामध्ये चालू वर्षाचे पोषण अभियानाची थीम तसेच महिनाभर घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. . जयश्री माजगांवकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तर आभार सुनिता पार्टे यांनी मानले . कार्यकमासाठी बीटमधील सर्व सेविका मदतनिस यांनी विशेष परिश्रम घेतले .
पौष्टीक आहार स्पर्धतील यशस्वी पालक स्पर्धक
प्रथम क्रमांक -सौ.. रेश्मा बेलोटे, द्वीतीय क्रमांक -रेखा कदम, तृतीय -दुर्गा मोरे, चतुर्थ- जयश्री बाचल, पाचवा – आनंदी आखाडे ,तर सेविका मदतनिस यांच्या मधून सुलोचना कदम ., गीता महाडीक, चित्रा भालेराव यांच्याही पदार्थांना उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली.