कुडाळ ता. १३ : जावळीच्या सहकाराचा मानबिंदू म्हणून प्रतापगड काराखान्याची आोळख आहे. सभासद शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्वर्गिय लालसिंगराव शिंदे यांचे स्वप्न अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवण्याची योग्य वेळ आली असून प्रतापगडचा येणाऱ्या हंगामात 4 लाख टनाच्या गाळपाचे उदिष्ठ कारखाना यसश्वीपणे पुर्ण करेल असा ठाम विश्वास सातारा जावळीचे आमदार व कारखान्याचे मार्गदर्शक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बोलताना व्यक्त केला.
सोनगाव ता. जावळी येथील प्रतापगड साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या सन २०२३- २०२४ च्या गळीत हंगामाची पुर्व तयारीसाठी रोलर पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्री भोसले बोलत होते, यावेळी कार्यक्रमास प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यतारा कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे यांच्यासह दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी वर्ग व कर्मचारी, सभासद उपस्थित होते, पुढे बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, गेल्या काही वर्षापासून प्रतापगड कारखाना बंद आहे मात्र कारखान्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच हा कारखाना जोमाने सूरू होणार असल्याने साहजिकच जावळीतील जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत, कारखान्याच्या सन २०२३- २०२४ च्या गळीत हंगामाकरिता यंत्रसामग्री देखभाल, दुरुस्ती आदी कामे प्रगतिपथावर असून प्रतापगडसाठी स्वतंत्र्य उस वाहतूक व तोडणी यंत्रणाही मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली असल्याने येथील शेतकऱ्यांचा उसही वेळेत जाईल, गळीत हंगामाची पूर्वतयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिलमधील रोलरचे आज पुजन होत आहे, येणाऱ्या हंगामात रोज किमान 3 हजार क्षमतेने उस गाळप करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न राहणार असून एकुण 4 लाखाचे उदिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे, प्रतापगड कारखाना हा आपल्या जावळीतील जनतेचा हक्काचा कारखाना असल्याने कारखाना सुस्थितीत चालवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीची आहे, काराखाना सुरळीत चालला तर आगामी काळात शेतकरी, उस उत्पादक, कामगार व येथील स्थानिक जनतेचे आर्थिक जिवनमान नक्की उंचावेल,
प्रतापगड कारखाऩ्याचे अध्यक्ष सैारभ शिंदे बोलताना म्हणाले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सहकार्याने व अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योगाच्या माध्यामातून प्रतापगड कारखाना येणारा हंगाम यशस्वी करणार आहे, हंगामाच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कामे जोमाने सूरू आहेत, कारखान्याच्या व्यवस्थापनानाने सूरू केलेल्या उस नोंदीला तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून कारखान्याकडे आत्तापर्यंत 5134 हेक्टर क्षेत्राची नेंद झालेली आहे, आपला कारखाना सुस्थितित चालण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या उसाच्या नोंदी कराव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अध्यक्ष सैारभ शिंदे, व सर्व संचालक, अधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या शुभहस्ते रोलरचे पुजन करण्यात आले. यावेळी सातारा आणि जावली तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– शशिकांत शिंदे, दिपक पवारांच्या गटाचाही उस गाळणार
जावळीतील अडचणीत असलेला प्रतापगड कारखाना चालवण्यास घेण्याचा मुख्य उद्देश हा स्थानिक शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हा असल्याने कारखाना सुस्थितीत चालण्यासाठी व्यवस्थापनाने तालुक्यातील सर्वांच्या उसाची नोंद घेतली आहे, यामध्ये पक्ष, गट- तट असा कोणताही निकष न लावता सरसकट सर्व शेतकऱ्यांचा उस गाळण्याचे आमचे धोरण आहे, राजकारण करण्यासाठी निवडणुका व इतर गोष्टी आहेत, मात्र कारखान्यात आम्ही कसलेही राजकारण करणार नाही यासाठी आमदार शशिकांत शिंदे असो किंवा दिपक पवार तालुक्यातील केणत्याही गटाच्या कार्यकर्त्यांचा उस नक्की गाळला जाईल, शेतकऱ्यांनी आपाल हक्काचा कारखाना म्हणून जास्तीत जास्त उसाच्या नोंदी कारखान्याकडे कराव्यात असे स्पष्ठ आवाहन आमदार शिवेंद्रसिंराजे यांनी बोलताना व्यक्त केले,