जावळीजिह्वासामाजिक

बामणोली तर्फ कुडाळला क्रांती दिन उत्साहात साजरा – हुतात्मा स्मारक परिसरात वृक्षारोपणासह ध्वजारोहण

कुडाळ ता 9 : जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथे हुतात्मा सर्जेराव जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेल्या हुतात्मा स्मारक येथे विविध सामाजिक व शासकीय उपक्रमांनी क्रांती दिन मोठया उत्साहामध्ये पार पडला.

क्रांतिदिनानिमित गावच्या वेशीवर असणाऱ्या क्रांती ज्योत स्मृतीस्तंभ यांचे पूजन होऊनजावळीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्वमान्यवरांच्या हाती प्रज्वलित पणत्या देऊन पंचप्रण शपथही घेण्यात आली.


न्यू इंग्लिश स्कुल बामणोली शाळेच्या विद्यार्थ्यांनी क्रांती दिन आणि हुतात्मा सर्जेराव जाधव यांच्याविषयी आपले मनोगत भाषणांतून व्यक्त केले. याप्रसंगी हुतात्मा सर्जेराव जाधव यांच्या जीवनाविषयी माहिती देणारी एक चित्रफीत देखील सादर करण्यात आली. हुतात्मा सर्जेराव जाधव यांचे वारसदार रविंद्र खाशाबा तरडे आणि मंदाकिनी गायकवाड, पवित्रा इथापे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या भव्य वास्तूसाठी भूदान करणारे भानुदास ग्यानबा तरडे व चंद्रकांत तरडे- इनामदार यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. माजी सैनिक रामदास तरडे व मुक्ता तरडे, तानाजी कांबळे यांना यावेळी गौरवण्यात आले. कार्यक्रमास तहसीलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, तालुका बांधकाम उपविभाग अधिकारी कदम, किसनवीर साखर कारखान्याचे संचालक हिंदुराव तरडे, सरपंच रेखाताई तरडे, उपसरपंच पवन तरडे, ग्रामसेवक, तलाठी तसेच सोमर्डी, बामणोली प्राथमिक शाळा ,माध्यमिक शाळा येथील सर्व शिक्षक व विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.चंद्रकांत अडसूळ व संध्या शिर्के यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button