मेढा ता. जावली येथील आमदार बाबासाहेब आखाडकर सभागृहत, भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा कदम यांचा सत्कार सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत भाजपा जावली यांच्यावतीने संपन्न झाला.नूतन भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी पदभार स्विकारल्यानंतर संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक मंडलात कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेऊन संपर्क अभियान सुरु केले आहे.
यावेळी सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाशदादा कदम, तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, जिल्हा सरचिटणीस शेखर वढणे, विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सातारा शहर अध्यक्ष विकास गोसावी,विधानसभा विस्तारक विस्तारक अविनाश खर्शीकर तसेच जावली तालुक्यातील जेष्ठ भाजपा नेते विजया आप्पा शेलार, मच्छिन्द्र क्षीरसागर, तानाजी शिर्के, हिंदुराव तरडे, दत्तात्रय वारागडे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभबाबा शिंदे, व्हाईस चेअरमन ऍड. शिवाजीराव मर्ढेकर, जावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन जयदीप शिंदे, संचालक प्रमोद शिंदे, मेढा नगरपंचायत माजी नगरअध्यक्ष पांडुरंग बापू जवळ, नगरसेवक दत्ताअण्णा पवार, विकास देशपांडे, माजी उप सभापती हणमंतराव जाधव, रवींद्र परामणे, संदीप परामणे, समीर आतार मेढा नगरपंचायत नगरसेवक, जिल्हा कार्यकारणी सदस्य विठ्ठल देशपांडे, ओबीसी महिला महिला जिल्हाध्यक्ष गीताताई लोखंडे, मेढा शहर अध्यक्ष विनोद वेंदे,सोनिया धनावडे, तालुका उपाध्यक्ष भानुदास ओंबळे,गणेश पवार, प्रदिप बेलोशे, जगनभाई गावडे, दीपक गावडे,महेश बेलोशे, विकी दळवी आदी युवा कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थां व लोकसभा निवडणुकीच्या दृष्टने पक्षाने दिलेले कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून येणाऱ्या काळात प्रत्येक पंचायत समिती गणातील सर्व बूथ समिती सदस्य, शक्तिकेंद्र प्रमुख यांचेशी गावोगावी जाऊन प्रत्यक्ष संवाद साधणार असल्याचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले. प्रत्येक बूथवर किमान 10 कमळ चिन्ह काढणे, पक्षाच्या नाम फालकाचे उदघाटन करणे, सर्वसामान्य लोकांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच राज्य सरकारच्या विविध योजनाची माहिती पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना केल्या. त्याचप्रमाणे संपर्क से समर्थन अभियंनंतर्गत 9090902024 या मोबाईल नंबर वर मिस्ड कॉल करावा. प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांनी saral app डाउनलोड करून त्यात आपली पूर्ण माहिती भरावी. नवीन मतदारांची नोंद करावी अशा सूचना सर्व भाजपा पदाधिकारी यांना धैर्यशील कदम यांनी केल्या.
आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती,नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थां, लोकसभा पुढे विधानसभा निवडणुकीत जावलीतील जनता खूप ताकतीने भाजपाच्या कमळ चिन्हाचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आणतील असा विश्वास आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. मेढा नगरपंचायतिचे फेर आरक्षण करून बहुतांशी खाजगी जागा आरक्षनातून वगळून घरपट्टी कमी केली.
तसेच जावली तालुक्यातील विकासकामांसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगून बोडारवाडी धरणाच्या सर्वेक्षणाच्या कामास उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाहिलाच मिटिंग मध्ये शेतीसाठी प्रकल्पास परवानगी मंजूर करून सर्व्हेच्या कामाला 80 लाखांची तरतूद केल्याचेही सांगितले.
या वेळी जावली तालुक्याच्या वतीने ऍड. शिवाजीराव मर्ढेकर, पांडुरंग बापू जवळ, तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी मनोगत व्यक्त करून तालुक्याचे नेते माजी जिल्हारिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांना भाजपा तर्फे विधानपरिषदेवर संधी मिळावी म्हणून मागणी केली. नगरसेवक विकास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर गीताताई लोखंडे यांनी आभार मानले.